पतंजलीच्या कोरोना औषधाबाबत केंद्र म्हणाले, रामदेव बाबांनी नवीन औषध दिले ही एक चांगली बाब पण…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । पतंजली आयुर्वेद लिमिटेडने करोना व्हायरसवर बनवलेल्या औषधाचे सर्व रिपोर्ट तपासल्यानंतरच सरकारकडून मंजुरी देण्यात येईल असे केंद्र सरकारच्या आयुष खात्याचे मंत्री श्रीपाद नाईक यांनी बुधवारी स्पष्ट केले. ‘आयुष’ मंत्रालयाने पतंजलीकडे या औषधातील घटकांचा तपशील मागितला आहे अशी माहिती नाईक यांनी दिली.

“बाबा रामदेव यांनी देशाला एक नवीन औषध दिले ही एक चांगली बाब आहे. पण नियमानुसार त्यांनी सर्वप्रथम आयुष मंत्रालयाकडे यायला पाहिजे होते” असे श्रीपाद नाईक एएनआय वृत्त संस्थेशी बोलताना म्हणाले. ‘पतंजलीने मंत्रालयाला रिपोर्ट पाठवला आहे. आम्ही तो रिपोर्ट तपासल्यानंतरच परवानगी देऊ’ असे नाईक यांनी सांगितले.

तत्पूर्वी, बाबा रामदेव यांच्या पतंजलीनं काल कोरोनावरील आयुर्वेदिक औषध ‘करोनिल’ लाँच केलं. केंद्र सरकारनं करोनावरील औषधाची जाहिरात थांबवण्याचे आदेश पतंजलीला दिले आहेत. पतंजलीने ‘करोनिल’ औषधासंबंधी जे दावे केलेत, त्याची पडताळणी पूर्ण होईपर्यंत दिशाभूल करणाऱ्या जाहीराती बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment