22 जानेवारीच्या ‘या’ विशेष मुहुर्तावर होणार रामललाची प्राणप्रतिष्ठा; असा पार पडेल संपूर्ण सोहळा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| येत्या 22 जानेवारी रोजी अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या भव्य राम मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या सोहळ्यासाठी विशेष असे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. त्यानुसार, रामललाचा अभिषेक सोहळा अभिजीत मुहूर्त मृगाशिरा नक्षत्रात होणार आहे. हा संपूर्ण कार्यक्रम 4 टप्प्यात विभागण्यात आला आहे. ज्याचा पहिला टप्पा 19 नोव्हेंबर रोजी सुरू झाला आहे. विशेष म्हणजे, या सोहळ्याची संपूर्ण जबाबदारी संघ परिवाराकडे सोपवण्यात आली आहे.

रामलला प्राणप्रतिष्ठा मुहूर्त

येत्या 22 जानेवारी रोजी ठीक मृगाशिरा नक्षत्रातील अभिजीत मुहूर्तावर दुपारी 12:20 वाजता प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरू करण्यात येईल. या काळामध्ये रात्री 11:36 ते 12:24 अशी एकूण 48 मिनिटे शुभ मुहूर्त असेल. तसेच, मृगाशिरा नक्षत्र 22 जानेवारी रोजी पहाटे 5:15 ते 23 जानेवारी रोजी पहाटे 5:36 पर्यंत असेल. त्यामुळे या कालावधीमध्ये सर्व विधी पूर्ण करण्यात येतील.

9 दिवसांच्या कार्यक्रमाचे आयोजन

येत्या 16 जानेवारीपासून राम लल्लाचा अभिषेक सोहळा सुरू होणार आहे. हा सोहळा 24 जानेवारीपर्यंत चालू राहील. नऊ दिवस चालणाऱ्या या सोहळ्यामध्ये श्री राम यंत्राची प्रतिष्ठापना करण्यात येईल. तसेच अनेक विविध कार्यक्रम पार पडतील. या नऊ दिवसाच्या कालावधीत सरयू पूजा , रामललाला अभिषेक, रथातून मिरवणूक, श्री राम यंत्राचे सरयूमध्ये विसर्जन असे विविध कार्यक्रम पार पडतील. या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रमुख उपस्थिती राहील. तसेच , 140 कोटी जनता या भव्य सोहळ्याची साक्षीदार होईल. हा भव्य असा कार्यक्रम पाहण्यासाठी लोक लांबून अयोध्येला जातील. त्यांच्यासाठी सर्व सुविधा राबवण्याची सोय आत्तापासूनच करण्यात आली आहे.

चलो अयोध्या अभियान

विशेष बाब म्हणजे, 22 जानेवारी रोजी होणाऱ्या भव्य सोहळ्यासाठी आणि जनतेला रामललाचे दर्शन घेण्यात यावे यासाठी भाजपने चलो अयोध्या अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या अभियानाअंतर्गत अयोध्येसाठी 36 विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहेत. या अभियानाची संपुर्ण जबाबदारी उत्तर भारतीय मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष संजय पांडे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. या अभियानामुळे अयोध्येतील सोहळ्यासाठी जनतेला प्रत्यक्षात साक्षीदार होता येईल.