Sarfaraz Khan ने रचला इतिहास, ब्रॅडमननंतर ‘हा’ पराक्रम करणारा ठरला दुसरा खेळाडू

sarfaraz khan
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मुंबईचा बॅट्समन सरफराज खानने (Sarfaraz Khan) रणजी ट्रॉफीमध्ये धमाकेदार कामगिरी करत इतिहास रचला आहे. सरफराजने (Sarfaraz Khan) रणजी ट्रॉफी 2022 च्या दुसऱ्या क्वार्टर फायनलमध्ये उत्तराखंडविरुद्ध शतक ठोकले आहे. सरफराजने 140 बॉलमध्ये 11 फोर आणि 2 सिक्सच्या मदतीने त्याचे शतक पूर्ण केले आहे. तो रणजी ट्रॉफीच्या यंदाच्या मोसमात सर्वाधिक रन करणारा खेळाडू बनला आहे. सरफराजच्या (Sarfaraz Khan) नावावर या मोसमात 600 पेक्षा जास्त रन झाल्या आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमधील त्याचे हे 7 वे शतक आहे. या सामन्यात तो 153 रनची खेळी करून आऊट झाला. या खेळीमध्ये त्याने 205 बॉलचा सामना करत 14 फोर आणि 4 सिक्स लगावले. तसेच त्याने मागच्या 5 इनिंगमध्ये त्याने 156 च्या सरासरीने 624 रन केल्या आहेत.

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये विक्रम
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पहिल्या सातही शतकांमध्ये 150 रन करणारा सरफराज (Sarfaraz Khan) पहिलाच खेळाडू ठरला आहे. रणजी ट्रॉफीमध्ये सरफराजने (Sarfaraz Khan) मागच्या 13 इनिंगमध्ये 6 शतकं केली आहेत. यामध्ये एक त्रिशतक, 3 डबल सेंच्युरी, 5 वेळा 150 पेक्षा जास्तचा स्कोअर आणि 3 अर्धशतकांचा समावेश आहे. रणजी ट्रॉफी 2022 मध्ये सरफराजने आतापर्यंत 275, 63, 48, 165 आणि 153 रन केले आहेत.

डॉन ब्रॅडमननंतर असा पराक्रम करणारा दुसरा खेळाडू
सरफराज खानच्या (Sarfaraz Khan) प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 2 हजार रन पूर्ण झाल्या आहेत. त्याने या रन 80 पेक्षा जास्तच्या सरासरीने केल्या आहेत. 2 हजार रन करताना ब्रॅडमननंतर सरफराजची (Sarfaraz Khan) सरासरी सर्वोत्तम आहे. त्यानंतर विजय मर्चंट यांनी 71.64 च्या सरासरीने, जॉर्ज हेडली यांनी 69.86 च्या सरासरीने आणि बहिर शाह यांनी 69.02 च्या सरासरीने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 2 हजार रन पूर्ण केले होते.

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वोत्तम सरासरी (2 हजार रन)

डॉन ब्रॅडमन- 95.14

सरफराज खान- 80

विजय मर्चंट- 71.64

जॉर्ज हेडली- 69.86

बहिर शाह- 69.02

हे पण वाचा :
Google Pay वर आता वापरता येणार Hinglish भाषा !!!

OTT प्लॅटफॉर्म आणि चित्रपटगृहांबाबत Abhishek Bachchan चे मोठे विधान !!!

खुशखबर !!! नवीन M2 चिप सहित येणार नवीन MacBook Pro आणि MacBook Air

पहिल्या वर्धापनदिनालाच पुन्हा ‘अडकले’ Income Tax पोर्टल, विभागाने इन्फोसिसला फटकारले

Drugs : भारत-पाक सीमेवर 15 कोटी किंमतीचे साडेतीन किलो हेरॉईन जप्त