सोलापूर : हॅलो महाराष्ट्र – ग्लोबल टिचर रणजितसिंह डिसले (Ranjit Singh Disley) यांचा राजीनामा प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी नामंजूर केला आहे. प्रशासकीय कारणास्तव राजीनामा मंजूर केल्याचे या आदेशात नमूद करण्यात आले आहे. परंतु, चौकशी समित्यांच्या अहवालात प्रतिनियुक्तीच्या काळातील त्यांची गैरहजेरी उघड झाली आहे. त्यामुळे डिसलेंवर (Ranjit Singh Disley) कारवाई प्रलंबित असल्याने राजीनामा नामंजूर करण्यात आल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे.
ग्लोबल टीचर रणजितसिंह डिसले (Ranjit Singh Disley) यांनी चौकशीचा ससेमिरा मागे लागल्यानंतर स्वत:चा 400 पानांचा खुलासा देऊन शिक्षकपदाचा राजीनामा प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे सोपविला. पण, दोन्ही चौकशी समित्यांच्या कचाट्यात अडकलेल्या ग्लोबल टीचरचा राजीनामा मंजूर होणे अशक्य आहे. राजीनामा मागे घेण्यासाठी 8 ऑगस्टपर्यंत मुदत होती पण शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी 5 ऑगस्टरोजी राजीनामा नामंजूर करत असल्याचं पत्र झेडपी सीईओ आणि डिसले गुरुजींना (Ranjit Singh Disley) पाठवलं आहे. चौकशी सुरू असताना राजीनामा किंवा राजीनामापूर्व नोटीस देखील देता येत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. प्रशासकीय कारण समोर करत शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी याबाबत अधिक भाष्य करण्यास मनाई केली आहे.
डिसलेंवर कारवाईची टांगती तलवार
शिंदे-फडणवीस सरकारचा वाद न्यायालयात सुरु आहे. अजून मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. सातत्याने दिल्ली दौरे सुरु असून अनेक आमदारांच्या मतदारसंघात सभा होत आहेत. त्यामुळे डिसले गुरुजी (Ranjit Singh Disley) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटल्यानंतरही त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार कायम आहे. अशा परिस्थितीत डिसले गुरुजींनी (Ranjit Singh Disley) स्वत:हून राजीनामा मागे घेतला नाही. आता प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनीच तो नामंजूर केल्याने आता डिसलेंवर काय कारवाई होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
हे पण वाचा :
शिवसेनेचा बंडखोर आमदार संतोष बांगर यांना मोठा दणका; केली ‘ही’ कारवाई
धक्कादायक ! कोल्हापुरात स्वतःच इंजेक्शन घेऊन डॉक्टर तरुणीची आत्महत्या
Petrol-Diesel Price : पेट्रोल, डिझेलची आज ‘इतकी’ वाढली किंमत?; जाणून घ्या आजचे दर
हिंगोलीत किरकोळ वादातून गाड्या पेटवल्या; भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल
INS Vikrant ची चौथी चाचणी यशस्वी; भारताच्या सागरी शक्तीत पडणार भर