लग्नानंतर लगेच रणवीरचा सिम्बा धमाका !!

1
53
Simba
Simba
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

फिल्मी दुनिया | रोहित शेट्टी दिग्दर्शित सिम्बा या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा बहुचर्चित चित्रपट २८ डिसेंबरला प्रदर्शित होणार असून रणवीरच्या चाहत्यांसाठी ही मोठी खुशखबर आहे.

दाक्षिणात्य सुपरस्टार ज्युनिअर एन.टी.आरच्या “टेम्पर” या चित्रपटाचा हा हिंदी रिमेक असून यात रणवीर सिंग पहिल्यांदाच एका मराठमोळ्या भूमिकेत दिसणार आहे. “संग्राम भालेराव” या पोलिस अधिकाऱ्याची भूमिका रणवीर साकारतोय. त्यासोबत सारा अली खान एका नवीन रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

नुकताच रणवीर-दीपिकाचा लग्न सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला असून दोघेही पतीपत्नी आपल्या संसाराचा आनंद लुटण्यात व्यस्त आहेत. त्यातच रणवीरच्या सिम्बाचं धुमधडाक्यात प्रदर्शन होणं ही दोघांसाठीही आनंदाची गोष्ट आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here