भाजपच्या ‘विशेष निमंत्रण पत्रिकेवरुन’ रावसाहेब दानवेंचे नाव गायब; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

औरंगाबाद – केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेला गॅस पाईप लाईनच्या उद्घाटन कार्यक्रम आज पार पडले. या कार्यक्रमासाठी भाजपतर्फे निमंत्रण पत्रिका तयार करण्यात आली आहे. या निमंत्रण पत्रिकेत स्थानिक नेत्यांची नावे आहेत. मात्र केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या नावाला मात्र फाटा देण्यात आला आहे.

भाजपतर्फे तयार करण्यात आलेल्या निमंत्रण पत्रिकेत केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, भाजपचे सरचिटणीस आमदार अतुल सावे, भाजप शहराध्यक्ष संजय केणेकर, जिल्हाध्यक्ष विजय औताडे तेवढीच नावे देण्यात आली आहेत.

दरम्यान मराठवाड्यातील महत्त्वाचे नेते तथा भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे नाव जाणीवपूर्वक टाळण्यात आले असल्याची चर्चाही दानवे गटातर्फे करण्यात येत आहे. मात्र शासकीय निमंत्रण पत्रिकेत मात्र रावसाहेब दानवे यांचे नाव आहे. हे नाव नसल्याने दानवी समर्थकांमध्ये नाराजीचा सूर दिसून आला.