गरोदर बकरीवर बलात्कार करून हत्या; आरोपीला अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एका गरोदर बकरीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याचा संतापजनक प्रकार केरळमधील कासारगोड जिल्ह्यात घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. सेंथिल असे आरोपीचे नाव असून तो मूळचा तामिळनाडूचा आहे. हॉटेल मालकाने तक्रार दिल्यानंतर त्याला अटक करण्यात आली

हाॅटेल मालकाच्या म्हणण्यानुसार मंगळवारी रात्री ११ वाजता बकरीच्या ओरडण्याचा आवाज येऊ लागला, त्यानंतर सर्व कामगार उठले. समोरचा प्रकार पाहिला तर तिथे प्रेग्नेंट बकरी पडलेली होती आणि तिच्या शरीरातून रक्त वाहत होते. त्या ठिकाणातून एक व्यक्ती पळून जाताना लोकांनी पाहिले. नंतर त्याची ओळख आरोपीच्या रुपात झाली. सेंथिल हाॅटेलमध्ये मागील २ वर्षांपासून तो काम करत होता.

या प्रकरणी एफआयआर नोंदवण्यात आला असून आरोपीवर प्राण्यांच्या क्रूरतेच्या संबंधात भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांतर्गत आरोप ठेवण्यात आले आहेत. या गुन्ह्यात आणखी दोन जणांचा सहभाग असल्याचे हॉटेल मालकांनी सांगितले असले तरी सेंथिल हा एकमेव आरोपी असल्याचे पोलिसांना आढळले.

होसदुर्ग स्टेशन हाऊस ऑफिसर म्हणाले की, तक्रारीच्या आधारे अनैसर्गिक गुन्ह्यासाठी कलम समाविष्ट केले आहे. “शवविच्छेदन करणाऱ्या सरकारी पशुवैद्यकीय शल्यचिकित्सकांच्या प्राथमिक अहवालात बकरीवर अनैसर्गिक लैंगिक छळ केल्याचे दिसून आले. सविस्तर अहवालातूनच मृत्यूचे कारण समोर येईल,” असे ते पुढे म्हणाले.