लग्नानंतर मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या विवाहितेवर पुजाऱ्याचा बलात्कार

Rape
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

राजस्थान : वृत्तसंस्था – जयपुरमधील चंदवाजी पोलिसांनी एका महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी मंदिरातील पुजाऱ्याला अटक केली आहे. 18 ऑगस्ट रोजी 23 वर्षीय विवाहित तरुणीने बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता.गावातील मंदिराचे पुजारी गोपाल उर्फ मुकेश जांगिड हे माझ्या बहिणीचे नातेवाईक आहे, त्यांनी बलात्कार केल्याचे तिने आपल्या तक्रारीत म्हंटले आहे. रविवारी सायंकाळी महिला आपले वडील आणि पतीसह भेरुची मंदिरात लग्नानंतर दर्शनासाठी गेली होती. त्या ठिकाणी पुजाऱ्याने रात्री हवन करण्याच्या बहाण्याने तिला थांबायला सांगितलं.

यानंतर पुजाऱ्याने तिचे पती आणि वडिलांना चौकात काही कामासाठी पाठवलं. यानंतर पुजाऱ्याने ती एकटी असल्याचा फायदा घेतला आणि साधारण पहाटे 3 वाजता नशेचं औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला. सकाळी जाग आल्यानंतर पुजारी तिला नातेवाईकांसह आपल्या कारमध्ये तिच्या गावी सोडायला आला. तेथे पोहोचल्यानंतर पीडितेने आपल्यासोबत झालेला प्रकार सांगितला.यानंतर कुटुंबीय जेव्हा पुजाऱ्याला पकडण्यासाठी गेले, तेव्हा पुजारी कार सोडून फरार झाला होता.

पीडितेने यानंतर पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी कारवाई करत कार जप्त केली आहे. गाडीत नशेत असल्याकारणाने महिला त्यावेळी पती वा वडिलांना तिच्यासोबत घडलेला प्रकार सांगू शकली नाही. पुजाऱ्याला पकडण्यासाठी पोलिसांच्या टीमने अलवर जिल्ह्यातील नारायणपूर, जयपूर जिल्ह्यातील शाहपुरा अशा अनेक ठिकाणी बंदोबस्त लावला. अखेर गुरुवारी सकाळी 10 वाजता पोलिसांनी फरार पुजाऱ्याला ताब्यात घेतलं.