पेढ्यातून गुंगीचे औषध देऊन मित्राच्या पत्नीवर बलात्कार 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – मित्राच्या पत्नीला पेढ्यातून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार करून व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत सतत अत्याचार करणाऱ्या आरोपी विरुद्ध एमायडीसीवाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याविषयी अधिक माहिती अशी की, पीडित 30 वर्षे महिला पती व दोन मुलांसोबत रांजणगाव परिसरात राहते. ही महिला पूर्वी नर्सरी कॉलनीत राहत असताना तिच्या पतीचा मित्र नितीन अशोक पतंगे यांच्यासोबत तिची ओळख झाली होती. गतवर्षी 8 एप्रिल रात्री नऊ वाजेच्या सुमारास ती घरी एकटी असताना नितीन पतंगे तिच्या घरी गेला होता. आमचा नवस पूर्ण झाल्याने पेढे घेऊन आलो असे थाप मारत नीतीने मित्राच्या पत्नीला पेढा दिला. पेढा खाल्ल्यानंतर पीडिता चक्कर येऊन बेशुद्ध पडली. त्यानंतर नितिनने तिच्यावर बलात्कार करून मोबाईल मध्ये चित्रीकरण केले. काही वेळाने शुद्धीवर आल्यानंतर अत्याचार झाल्याचे लक्षात येताच पीडितेने आरोपींनी तिला जाब विचारला असता, त्याने या प्रकरणाची वाच्यता केल्यास हा व्हिडिओ सर्वांना दाखवीन अशी धमकी दिली होती. बदनामीच्या भीतीमुळे महिलेने या घटनेची कुठेही वाच्यता केली नाही व चार महिन्यांपूर्वी दुसऱ्या ठिकाणी राहण्यासाठी निघून गेली होती.

घर बदलूनही पीडितेचा छळत थांबला नाही. नितीन तिच्यावर मित्राच्या घरी, शेतात व तिच्या घरी अत्याचार करत होता. 20 नोव्हेंबरला दुपारी अडीच वाजेच्या सुमारास पीडिता घरी एकटी असताना आरोपीने पुन्हा तिच्यावर बलात्कार केला. तेव्हा मात्र पीडितेने पतीला हे सर्व सांगितले. पीडितेच्या पतीने तिला धीर देत सोबत घेऊन पोलिस ठाण्यात आला. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून आरोपी नितीन अशोक पतंगे (23, रा. रांजणगाव) याच्या विरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राजेंद्र बांगर हे तपास करत आहेत.

Leave a Comment