माहेरी आलेल्या नवविवाहितेवर बलात्कार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद  प्रतिनिधी |लग्न होऊन अवघ्या तिसऱ्या दिवशी माहेरी आलेल्या 19 वर्षीय नावविवाहितेला फरपटत नेत तिचे अपहरण केले व निर्जनस्थळी नेट तिच्यावर पाशवी बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील डागपिंपळगाव येथे घडली घटनेनंतर आरोपी आप्पा मधुकर माकोडे हा पसार झाला आहे पोलीस त्याच शोध घेत आहे.

पीडित तरुणीचे 14 मे रोजी परिसरातीलच एका गावातिल तरुणासोबत मोठ्या थाटामाटात लग्न झाले होते.
डागपिंपळगाव येथे विवाह समारंभ संपून नवरी सासरी गेली होती. सासरहून हळद उतरविण्यासाठी परतीने माहेरी डागपिंपळगाव येथे 16 मे रोजी परत आली. त्यादिवशी घरात धार्मिक विधी करून सर्वजण झोपले होते. रात्री एक वाजेच्या सुमारास आप्पा माकोडे या आरोपीने पीडितेला फोन केला. तू माझ्यासोबत बोलण्यासाठी घरा बाहेर ये, नाहीतर झोपलेल्या तुझ्या आई वडिलांच्या डोक्यात दगड घालून जीवे मारीन अशी धमकी दिली. भेदरलेली पीडितेने स्वतःला सावरत आप्पा माकोडेशी बोलण्यासाठी घराबाहेर आली. चल आपल्याला बोलायचे आहे गाडीवर बस असे म्हणतात पीडिता घाबरली व तिने बसण्यास विरोध केला मात्र आप्पा माकोडे ने बळजबरी करत फरपटत आपल्या गाडीवर बसवून येवल्याच्या दिशेने घेऊन गेला. येवल्याच्या नजीक रस्त्याच्या कडेला आडरानात दुचाकी थांबवून तिला गाडी च्या खाली उतरून रस्त्याच्या कडेला बळजबरीने बलात्कार केला. त्याच स्थितीत आरोपीने पीडितेला येवल्याच्या जवळ सोडून पोबारा केला. कसेबसे सावरत भेदरलेल्या स्थितीत येवला येथील पोलिस ठाणे गाठले. घडलेली हकीकत पोलिसांना सांगितली, पोलीसांनी घटनेचे गांभीर्य ओळखत पीडिताच्या आई-वडिलांना फोन करून बोलावून घेतले. नातेवाइकांनी विरगाव पोलीस ठाणे गाठत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. या घटनेचे गांभीर्य ओळखत पोलिसांनी उपविभागीय पोलिस अधिकारी पवार यांच्याकडे तपास दिला आहे. या घटनेनंतर आरोपी पसार झाला आहे पोलीस त्याचा कसून शोध घेत आहे.

माझ्या लग्नाच्या तिसऱ्या दिवशी माझ्या जीवनात असा दुर्दैवी प्रसंग घडला.माझी अब्रू लुटणाऱ्या नाराधमास कडक शासन व्हावे अशी माग्नी पीडितेंने केली आहे.

Leave a Comment