नवी दिल्ली । जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काहो दिवसांत सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांविरोधात मोर्चा उघडला आहे. काश्मीर खोऱ्यातील दहशत संपवण्यासाठी त्वरित कारवाई केली जात आहे. सुरक्षा दलाने गेल्या 8 दिवसांत 8 दहशतवाद्यांचा खात्मा केला. तर यावर्षी आतापर्यंत 86 हून अधिक दहशतवादी ठार करण्यात आले आहेत. असे म्हटले गेले असले तरीही पूर्वीच्या तुलनेत ही संख्या खूपच कमी आहे.
गेल्या आठवड्यात जम्मू-काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात सुरक्षा दले आणि दहशतवाद्यांमधील चकमकीत लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडर सहित दोन अतिरेकी ठार झाले होते. इश्फाक दार उर्फ अबू अक्रम केवळ सुरक्षा दलांवरील हल्ल्यांसाठीच नव्हे तर अनेक नागरिकांच्या हत्येसही जबाबदार होता. आजकाल जवळपास दररोज किमान एक दहशतवादी मारला जात आहे. चला तर मग दहशतवाद्यांवरील अलीकडील कारवायांबाबत जाणून घेऊयात …
बांदीपोरा मध्ये चकमक
24 जुलै रोजी जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यात सुरक्षा दलाने तीन अज्ञात दहशतवाद्यांना ठार मारले होते. या चकमकीत सैन्याचा एक जवान जखमी झाला आहे. उत्तर काश्मीरमधील बांदीपोरा येथील सुंबरार भागात शोखबाबा जंगलात दहशतवाद्यांची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाने तेथे एक शोधमोहीम सुरू केली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, ठार झालेल्या दहशतवाद्यांची ओळख आणि ते कोणत्या दहशतवादी संघटनेचे होते याचा शोध घेतला जात आहे.
बारामुल्ला मध्ये चकमक
जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर भागात सुरक्षा दले आणि दहशतवाद्यांमधील रात्रीच्या चकमकीत लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडर सहित दोन दहशतवादी ठार झाले. लष्करचा प्रमुख कमांडर फैज अहमद वार ऊर्फ रुकना उर्फ उमर, वारपोडा येथील रहिवासी आणि चेरपोरा बडगामचा रहिवासी शाहीन अहमद मीर उर्फ शाहीन मौलवी अशी दहशतवाद्यांची नावे आहेत.
शोपियान जिल्ह्यात एनकाउंटर
19 जुलै रोजी जम्मू-काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात सुरक्षा दले आणि दहशतवाद्यांच्या दरम्यान झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरसह दोन दहशतवादी ठार झाले होते. इश्फाक दार उर्फ अबू अक्रम केवळ सुरक्षा दलांवरील हल्ल्यांसाठीच नव्हे तर नागरिकांच्या हत्येस जबाबदार होता.
आतापर्यंत 86 हून अधिक ठार
जुलैमध्ये आतापर्यंत 10 पेक्षा जास्त चकमकी झाल्या आहेत. 20 दहशतवादी ठार झाले आहेत, ज्यात चार पाकिस्तानी मूळचे असल्याचे सांगितले जात आहे. यावर्षी आतापर्यंत सुरक्षा दलांनी 40 हून अधिक ऑपरेशन केले असून यात 86 दहशतवादी ठार झाले. त्यापैकी 80 जण काश्मीरमध्ये आणि 6 जण जम्मूमध्ये ठार झाले आहेत. यातील बहुतेक दहशतवादी लष्कर-ए-तैयबाचे होते. या कारवाईत 15 हून अधिक सुरक्षा कर्मचारी शहीद झाले आणि 19 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला.