हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Rapo Rate Hike : RBI कडून रेपो दरामध्ये 0.50% नी वाढ करण्यात आली आहे. ज्यामुळे आता रेपो दर 4.40% वरून 4.90% झाला आहे. यामुळे येत्या काही दिवसांत होम लोनपासून ते ऑटो लोन आणि पर्सनल लोनपर्यंत सर्व काही महागणार आहे आणि जास्त EMI भरावा लागेल. गेल्या महिन्यात देखील RBI ने रेपो दरात वाढ केली होती, त्यामुळे कर्जाचे व्याजदरातही वाढ झाली. आता महिनाभरानंतर दुसऱ्यांदा रेपो दरात वाढ झाल्याने त्याचा थेट परिणाम जनतेच्या खिशावर होणार आहे.
RBI कडून बँकांना ज्या दराने कर्ज मिळते त्याला रेपो रेट म्हणतात. रेपो दरातील बदलांचा परिणाम बँकांकडून देण्यात येणाऱ्या इतर कर्जावरील व्याजदरांवर होतो. कारण जर RBI कडून पैसे घेण्यासाठी बँकांना जास्त व्याज द्यावे लागले तर त्या वाढलेल्या व्याजाचा भार ग्राहकांना सोसावा लागेल. त्याचप्रमाणे, जेव्हा रेपो दर कमी होतो, तेव्हा बँका देखील आपल्या कर्जांचे व्याजदर कमी करतात. Rapo Rate Hike
होम लोन वरील EMI मध्ये वाढ होणार
हे आपण एका उदाहरणा द्वारे घेउयात…. समजा जर एखाद्या व्यक्तीने 20 वर्षांसाठी 60 लाख रुपयांचे होम लोन घेतले आणि सध्या त्याला 7.05 टक्के व्याज द्यावा लागत असेल तर आता ग्राहकाला 7.55 टक्के दराने व्याज द्यावे लागेल. तसेच 20 वर्षांसाठी घेतलेल्या 60 लाखांच्या कर्जाचा EMI आता 46,698 रुपये असेल तर ग्राहकाला एकूण 5,207,564 रुपये व्याज म्हणून द्यावे लागतील. Rapo Rate Hike
मात्र या व्याजदरवाढीमुळे आता त्याला प्रत्येक महिन्याला 48,520 रुपये EMI म्हणून भरावे लागतील म्हणजेच एकूण 5,644,608 रुपये व्याज म्हणून भरावे लागतील. म्हणजेच, होमलोनवर दरमहा EMI मध्ये 1,822 रुपयांची वाढ होईल. आणि एकूण व्याज देखील सुमारे 4.38 लाख रुपयांनी वाढेल.
अशा प्रकारे ऑटो लोनवर परिणाम होईल
जर एखाद्या व्यक्तीने 5 वर्षांसाठी 5 लाख रुपयांचे ऑटो लोन घेतले आणि त्याला 7.80 टक्के दराने व्याज द्यावे लागत आहे. तर त्याचा व्याज दर आता वार्षिक 8.30 टक्क्यांवर येईल. जर सध्या, ग्राहकाला दरमहा 10,090.5 रुपये EMI म्हणून भरावे लागत असतील तर या कर्जावर त्याला संपूर्ण कालावधीसाठी 1,05,424.5 रुपये व्याज द्यावे लागेल. Rapo Rate Hike
मात्र जर बँकेकडून व्याज दर वाढवले गेले तर जास्त EMI आणि व्याज द्यावे लागेल. जर व्याजदर 8.30 असेल तर ग्राहकाचा EMI 10,210 रुपये असेल आणि एकूण 1,12,608 रुपये व्याज म्हणून द्यावे लागतील. अशा प्रकारे, EMI 120 रुपयांनी वाढेल आणि एकूण व्याज देखील 7,183 रुपयांनी जास्त भरावे लागेल. Rapo Rate Hike
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.rbi.org.in/
हे पण वाचा :
education loan : ‘या’ बँकामध्ये कमी व्याजदराने मिळेल शैक्षणिक कर्ज !!!
Ration Card मध्ये घरातील नवीन सदस्याचे नाव नोंदवण्याची प्रक्रिया जाणून घ्या
RBI ने महागाई नियंत्रणात आणण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या ‘हे’ जाणून घ्या
RBI कडून रेपो दरात पुन्हा वाढ, आता EMI साठी द्यावे लागणार जास्त पैसे
…म्हणून पंकजा मुंडेंना उमेदवारी नाकारली; चंद्रकांतदादांचे महत्वाचे विधान