किंमत मोजावी लागली तरी चालेल पण दिलेला शब्द पाळतो! अजित पवार यांचा पलटवार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बारामती प्रतिनिधी । 4 सप्टेबरला इंदापूरमध्ये केलेल्या मेळाव्यात पाटील यांनी पवारांवर दगाबाजी, धोकेबाजी आणि शब्द फिरवल्याचा आरोप केला होता. त्याला अजित पवारांनी आज बारामतीत उत्तर दिलंय. ते म्हणाले, अजित पवार एकदा दिलेला शब्द कधीही पाळतो. मग त्यासाठी कितीही किंमत मोजावी लागली तरी चालेल असं सांगून पाटील हे खोटे आरोप करीत असल्याचं पवार यांनी सांगितलंय. पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मान्य असेल असा शब्द पाटील यांना दिला होता असंही त्यांनी स्पष्ट केलं.

ते पुढे म्हणाले, सांगायला काही नाही म्हणून सर्व काही राष्ट्रवादीने केलं असा आरोप हर्षवर्धन पाटील करीत आहेत. पुण्यात झालेल्या बैठकीत इंदापूरबाबत मी शब्द दिला होता. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार जो निर्णय घेतील तो निर्णय आपल्याला मान्य असेल असं मी सांगितलं होतं. मात्र राष्ट्रवादीविरुद्ध वातावरण तयार केलं जातंय असा आरोप त्यांनी केला. हर्षवर्धन पाटील यांच्याशी आपला कुठलाही वयक्तिक वाद नाही असंही ते म्हणाले.

 

हर्षवर्धन पाटील यांनी 4 सप्टेंबरला झालेल्या इंदापूरातल्या मेळाव्यात एकदाचे आपल्या मनात वर्षानुवर्षे साचलेल्या भावनांना मोकळी वाट करून दिली. यांनी त्यांचा भाजपकडे जायचा कल आहे. हे सूचकपणे सांगितले आणि जनसंकल्प मेळाव्याला उपस्थित इंदापूरकरांनीही भाजप, भाजप, कमळ, कमळ म्हणत तोच कौल दिला. अर्थात 10 सप्टेंबरच्या आसपास आपण काँग्रेस सोडून कुठं जाणार याचा अंतिम निर्णय घेऊ म्हणत त्यांनी थोडी संदिग्धता ठेवलीय.

इतर महत्वाच्या बातम्या –

शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या ‘या’ आमदाराच्या विरोधात बॅनरबाजी

मुख्यमंत्री पदाबाबत रामदास आठवले यांचे मोठे विधान

हर्षवर्धन पाटलांचं ठरलं ! ११ सप्टेंबरला करणार भाजपमध्ये प्रवेश

तर मी खासदारकीचा राजीनामा देवून पुन्हा निवडणुकीला सामोरे जाईल : खासदार अमोल कोल्हे

एमआयएमच्या युती तोडण्याच्या निर्णयावर प्रकाश आंबेडकर म्हणतात