Ration Card | रेशन कार्ड धारकांना मिळणार नाही गहू; E- KYC करण्याच्या तारखेतही वाढ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Ration Card | आपले राज्य सरकारने केंद्र सरकार हे सामान्य जनतेसाठी विविध योजना आणत असतात. त्याचा फायदा अनेक नागरिकांना होतो. सरकारने गरीब नागरिकांसाठी रेशन कार्ड योजना आणलेली आहे. या योजनेअंतर्गत रेशन कार्डधारकांना स्वस्त दरामध्ये धान्य मिळत असते. तसेच इतर अनेक गोष्टी देखील मिळत होत्या. परंतु आता सोयगाव तालुक्यातील रेशन कार्ड ( कांसाठी दिवाळीत रेशन येणार होते. त्यात एक बदल करण्यात आलेला आहे. तो म्हणजे आता या रेशन धारकांना गहू कमी दिले जाणार आहे. आणि त्या ऐवजी नागरिकांना ज्वारी देण्यात येणार आहे. सोयगाव तालुक्यातील नागरिकांसाठी जवळपास 1000 क्विंटल ज्वारी आलेली आहे. आणि ती तालुक्यातील लोकांना वाटप केली जाणार आहे. या तालुक्यातील विविध योजनेचा 24000 शिधापत्रिकाधारक आहेत. यामध्ये शिलापत्रिकाधारकांना रेशन दुकानातून जवळपास 15 किलो गहू देण्यात येत होता.

परंतु आता त्यामध्ये 6 किलोची कपात केली जाणार आहे. आणि नागरिकांना 9 किलो गहू आणि 6 किलो ज्वारी देण्यात येणार आहे. रेशन कार्ड धारकांना तांदूळ देखील देण्यात येतो. परंतु या तांदळात कोणत्याही प्रकारची कपात केलेली नाहीये. रेशन कार्डधारकांना 7 किलो तांदूळ आणि अन्न सुरक्षा योजनेतील कार्डधारकांना 4 किलो तांदूळ दिला जाणार आहे. सरकारच्या या योजनेचा फायदा आतापर्यंत राज्यातील अनेक नागरिकांना झालेला आहे.

या आधी सरकारने रेशन कार्डधारकांनाही केवायसी पूर्ण करण्यास सांगितलेले होते. सुरुवातीला 31 सप्टेंबर ही केवायसी करण्याची शेवटची तारीख दिली होती. परंतु अनेक नागरिकांनी ही केवायसी केलेली नाही. त्यामुळे सरकारने ही तारीख वाढवून 31 ऑक्टोबर पर्यंत केली होती. परंतु अद्यापही अनेक लोकांची ई केवायसी पूर्ण झालेली नाही. म्हणून सरकारने ही केवायसी करण्याची प्रक्रिया 31 डिसेंबर पर्यंत वाढवलेली आहे. जर 31 डिसेंबर पर्यंत कोणत्या नागरिकाने केवायसी केले नाही, तर त्याला रेशन मिळणार नाही असे देखील सांगण्यात आलेले आहे. त्यामुळे जर तुम्ही तुमच्या रेशन कार्डचे इ केवायसी केले नसेल तर लवकरात लवकर करून घ्या.