हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील रेशनकार्ड धारकांसाठी (Ration Card) मोठी आनंदाची बातमी आहे. आता रेशनकार्ड वर मिळणाऱ्या मोफत धान्यासोबत ग्राहकांना १००० रुपयांची आर्थिक मदतही देण्यात येणार आहे. याबाबत केंद्र सरकारने गरीब आणि गरजू कुटुंबांसाठी एक नवीन महत्वाकांक्षी योजना जाहीर केली आहे. गरीब नागरिकांसाठी केंद्र सरकारने हि योजना सुरु केली आहे. त्यानुसार, ज्या कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न २ लाख रुपयांपेक्षा कमी आहे आणि ज्यांच्याकडे रेशनकार्ड आहे अशा लोकांना दर महिन्याला मोफत धान्यासोबत १००० रुपयांची मदतही मिळणार आहे. ज्या कुटुंबांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही त्यांच्यासाठी ही योजना सर्वात जास्त फायदेशीर आहे. ही योजना १ जून २०२५ पासून लागू केली जाईल.
काय आहे पात्रता?
केंद्र सरकार (Central Government) सातत्याने गरीब जनतेसाठी नवनवीन योजना राबवत असते. महिन्याला १००० रुपये देण्याची योजना सुद्धा त्याचाच एक भाग आहे. गरीब आणि गरजू कुटुंबांना आर्थिक मदत करणे हाच या योजनेचा मुख्य उद्देश आहे. मात्र त्यासाठी काही अटी सुद्धा आहेत. या योजनेचा लाभ फक्त अशा लोकांनाच मिळेल ज्यांच्याकडे रेशनकार्ड आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे वार्षिक उत्पन्न २ लाख रुपयांपेक्षा कमी असावे. तुमच्या रेशनकार्ड ची केवायसी सुद्धा करावी लागेल. या योजनेतील प्रत्येक लाभार्थ्याला अन्न सुरक्षा प्रदान केली जाईल. तसेच या योजनेत पारदर्शकता राखण्यासाठी प्रत्येक लाभार्थ्याच्या बँक खात्यात दर महिन्याला १,००० रुपयांची आर्थिक मदत जमा केली जाईल.
असा करा अर्ज?
या योजनेसाठी अर्ज करायचं असल्यास, सर्वात आधी राज्य अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
तेथे ‘रेशन कार्ड नवीन योजना २०२५’ शी संबंधित अर्ज लिंकवर क्लिक करा.
रेशन कार्ड क्रमांक इत्यादी आवश्यक तपशील भरा,
आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि फॉर्म सबमिट करा.
महत्वाची बाब म्हणजे योजनेचा लाभ फक्त पात्र लोकांनाच मिळावा यासाठी सरकारने ई-केवायसी अनिवार्य केले आहे.




