Ration Card | आजच करा हे काम; अन्यथा रेशन मिळणे होईल कायमचे बंद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Ration Card | सरकारकडून देशातील सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध योजना आणल्या जातात. सामान्य नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन त्यांना केंद्रस्थानी ठेवूनच सरकार विविध योजना आणत असतात. सरकारने दारिद्र्यरेषेखालील लोकांना दर महिन्याला रेशन देखील दिले जाते. शिधापत्रिके मार्फत हे रेशन दिले जाते. यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे पैसे मोजावे लागत नाही. सरकारकडून दर महिन्याला तुम्हाला राशन दिले जाते. अशातच राशन कार्ड धारकांसाठी सरकारकडून एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. ती म्हणजे जर तुम्ही तुमच्या राशन कार्डला तुमचे आधार कार्ड लिंक केले असेल, तरच तुम्हाला इथून पुढे या योजनेचा लाभ मिळणार आहे.

आज- काल बनावट राशन कार्डचा (Ration Card) वापर खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. हा वापर रोखण्यासाठी ही प्रक्रिया समोर आलेली आहे. त्यामुळे कामकाजामध्ये देखील पारदर्शकता राहणार आहे त्यामुळे तुमच्या रेशन कार्डला आधार कार्ड लिंक असणे खूप गरजेचे आहे. ही प्रक्रिया तुम्ही अगदी घरी बसून मोबाईलवर देखील करू शकता.

आधार-रेशन लिंकची शेवटची तारीख | Ration Card

सरकारने आधार कार्ड रेशन करण्यासाठी मुदत देखील दिलेली आहे. तुम्ही 30 सप्टेंबरपर्यंत आधार कार्ड रेशनला लिंक करू शकता. तुमच्यासाठी बराच वेळ आहे. परंतु शेवटच्या दिवसांमध्ये सर्वर डाऊनची समस्या निर्माण होते. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर तुमच्या रेशन कार्डला आधार कार्ड लिंक करून घ्या.

आधार-रेशन लिंक कसे करायचे ? | Ration Card

  • तुम्हाला सगळ्यात आधी सार्वजनिक वितरण प्रणालीच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
  • या वेबसाईटवरून तुम्हाला लॉगिन करावे लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला या वेबसाईटवर तुमचा रेशन क्रमांक आणि इतर माहिती भरायचे आहे.
  • ज्या सदस्यांची नावे आधारमध्ये नोंदणीकृत आहे. तुम्हाला त्यांच्या आधार कार्ड क्रमांक देखील टाकायचे आहेत.
  • त्यानंतर तुम्ही आवश्यक असलेली सगळी माहिती भरा. आणि सबमिट या बटनावर क्लिक करा त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल.
  • तुम्ही तो ओटीपी भरा आणि सबमिट या बटनावर क्लिक करा.
  • अर्ज सबमिट केल्यानंतर तुम्हाला एप्लीकेशन कन्फर्मेशनचा एक मेसेज देखील येईल.