Ratnagiri Airport : महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांत उभारण्यात येणार नवीन विमानतळ; उदय सामंत यांची घोषणा

Ratnagiri Airport
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Ratnagiri Airport। एकीकडे नवी मुंबई विमानतळाच्या उदघाटनाकडे सर्वांचे लक्ष्य असताना आता महाराष्ट्राच्या प्रवाशांना आणखी एका नव्या विमानतळाची भेट मिळणार आहे. हे विमानतळ कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात सुरु होणार आहे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी या विमानतळाबाबत माहिती दिली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील हे विमानतळ पुढील 6 ते 7 महिन्यांत मालवाहतूक आणि प्रवासी वाहतुकीसाठी पूर्णपणे तयार होईल. एप्रिल 2026 पर्यंत हे विमानतळ पूर्णपणे कार्यान्वित होईल तसेच यामुळे मुंबई ते रत्नागिरी 326 KM चे अंतर केवळ 1 तासात पार करता येणार आहे. असं उदय सामंत यांनी सांगितलं. यामुळे कोकणवासियांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मुंबईहून कोकणात जायचं म्हंटल तर अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय.. मुंबई गोवा महामार्गाचे काम अजून १०० टक्के पूर्ण झालेले नाही. रेल्वेने जायचं म्हंटल तर तिथेही खूप गर्दी असते. मुंबई ते रत्नागिरीचे अंतर सुमारे 326 किलोमीटर आहे. रस्त्याने प्रवास केल्यास 7-8 तास लागतात, रेल्वे ने सुद्धा हीच अवस्था आहे. अशावेळी रत्नागिरी येथील विमानतळ कोकणवासीयांना खूप फायदेशीर ठरेल. कारण एकदा का रत्नागिरी विमानतळ (Ratnagiri Airport) सुरू झाले कि मग मुंबई आणि कोकणमधील प्रवास फक्त 1 तासात पार केला जाऊ शकतो. यामुळे प्रवाशांचा अमूल्य वेळ वाचेल.

रत्नागिरी विमानतळ कधी होणार सुरु ? Ratnagiri Airport

मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी विमानतळाच्या (Ratnagiri Airport ) प्रगतीबाबत अपडेट्स देताना म्हंटल कि, पुढील 6-7 महिन्यांत हे विमानतळ मालवाहतूक आणि प्रवासी वाहतुकीसाठी पूर्ण तयार होईल. एप्रिल 2026 पर्यंत हे विमानतळ पूर्णपणे कार्यान्वित होईल. याशिवाय रत्नागिरी फ्लाईंग क्लबची स्थापना केली जाईल, ज्यामुळे या भागात एरोबॅटिक प्रशिक्षण आणि लहान विमानांच्या ऑपरेशन्ससाठी नवीन सुविधा उपलब्ध होतील.

नवी मुंबई विमानतळ कधी सुरु होणार?

दरम्यान, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस पार पडणार आहे. त्यादृष्टीने प्रशासनाची जय्यत तयारी सुरु आहे. नवी मुंबईतील नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणारा प्रवाशांचा ताण कमी होणार आहे. तसेच नवी मुंबई आणि ठाणे परिसरातील प्रवाशांना सुद्धा त्याचा फायदा होणार आहे.. याशिवाय रत्नागिरी फ्लाईंग क्लबची स्थापना केली जाईल, ज्यामुळे या भागात एरोबॅटिक प्रशिक्षण आणि लहान विमानांच्या ऑपरेशन्ससाठी नवीन सुविधा उपलब्ध होतील.