निवडणुकीत मर्यादेपेक्षा अधिक खर्च केल्यामुळे आमदार रवी राणा यांच्या अडचणीत वाढ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अमरावती प्रतिनिधी । बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष विजयी उमेदवार रवी राणा यांनी निवडणूक आयोगाव्दारे ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा अधिक खर्च केला आहे.तसा अहवाल भारतीय निवडणूक आयोगाकडे निवडणूक निरीक्षकांनी पाठविला असल्यामुळे रवि राणा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

भारतीय निवडणूक आयोग यांनी विधानसभेसाठी उभे राहणार्‍या उमेदवाराला निवडणूक खर्चाची मर्यादा घालून दिली असून २८ लाख रुपयांपर्यंतची आहे. या खर्च मर्यादेबाबत राज्य निवडणूक आयोगाद्वारे व केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे उच्च दर्जाचे अधिकारी निवडणूक निरीक्षक ऑब्झर्वर म्हणून नियुक्त करण्यात येतात. त्यानुसार बडनेरा विधानसभा मतदारसंघात अतोनात खर्च करणार्‍या आमदार रवी राणा यांच्या खर्चावर निवडणूक खर्च निरीक्षकाकडून आक्षेप नोंदविण्यात आले होते. त्यासोबतच रवी राणा यांना वेळोवेळी खर्चा संदर्भात समजही देण्यात आली होती. निवडणूक खर्च मर्यादेपेक्षा दीडपट जास्त रक्कम खर्च करणार्‍या रवी राणा यांच्या सादर करण्यात आलेल्या हिशोबाच्या ताळ्यावर आक्षेप घेऊन निवडणूक निरीक्षक यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे अहवाल सादर केला.

शिवसेनेच्या बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार श्रीमती प्रीती संजय बंड यांची निवडणूक प्रतिनिधी असलेले अशिष धर्माळे यांनी राणा यांच्या हिशेबा संदर्भात माहिती मागितली. यावर आमदार रवी राणा यांचे निवडणूक खर्चाबाबतचे प्रकरण भारतीय निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आले असल्यामुळे आपण माहिती देण्यासाठी असमर्थता राणा यांनी दर्शविली आहे.त्याबाबतचे लेखी पत्र निवडणूक  निर्णय अधिकारी यांनी देऊन सदर माहिती देण्यासंदर्भात जिल्हा निवडणूक अधिकारी यांना सुद्धा मार्गदर्शन मागितले आहे. निवडणूक खर्च जास्त झाला म्हणून राज्यात अशाप्रकारे निवडणूक आयोगाकडे तक्रार नोंदविण्याची ही पहिली घटना आहे.

दरम्यान रवी राणा यांनी सादर केलेल्या खर्चावरुन निवडणूक निरीक्षकांनी आक्षेप घेतला आहे. या प्रकरणात रवी राणा अडचणीत आले असताना त्यांच्या पत्नी खा.नवनीत राणा यांच्या जातीचे प्रकरण सध्या न्यायालयात गाजत आहे.असे असताना आ.पती रवी राणा व पत्नी खा.नवनीत राणा हे दांम्पत्य आता वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.

 

WhatsApp Image 2019-12-02 at 1.31.33 PM.jpeg

Leave a Comment