हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| विधानसभा निवडणुकीत 2024 (Assembly Election) मध्ये पुण्यातून काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांना पराभवाचा सामना करावा लागला. तसेच, इतर ठिकाणी ही काँग्रेसला (Congress ) काही जागांवरच समाधान मानावे लागले. त्यामुळे आता काँग्रेसचे अनेक नेते पक्षांतर करण्याच्या तयारीमध्ये असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. महत्वाचे म्हणजे, रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांचे देखील नाव या चर्चेमध्ये आहे. कारण आज स्वतः धंगेकर यांनी काँग्रेस पक्ष सोडणार असून ते शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश करणार असल्याचे सांगितले आहे.
माध्यमांशी बोलताना रवींद्र धंगेकर म्हणाले की, “एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे मी काहीही मागितलं नाही, त्याच्यासोबत काम करायचं आहे. काँग्रेस सोडत असताना वाईट वाटतं आहे. एकनाथ शिंदे यांनी दोन ते तीन वेळा फोन केला. उदय सामंत देखील भेटले होते, त्यांनी आमच्याकडे या असं सांगितलं आहे” अशी माहिती धंगेकर यांनी दिली.
त्याचबरोबर, “ज्या पक्षासोबत मी गेली १०-१२ वर्षे काम करत आहे. त्यामुळे पक्षातील अनेकांसोबत कौटुंबिक नातं तयार झाले आहे. सर्वांनीच माझ्यावर प्रचंड प्रेम केले आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सगळ्यांना माझ्यापाठी ताकद उभी केली. मी निवडणूक हरलो हा नंतरचा विषय,पण सगळ्यांना त्यांच्या ताकदीप्रमाणे कष्ट केले. एखादा पक्ष सोडताना दु:ख होतं याचं कारणच नाही, शेवटी आपण माणूस आहे. कार्यकर्ते बऱ्याच दिवसांपासून ऐकत नव्हते. मी मतदारांशी संवाद साधला. त्यांचं म्हणणं, आता आमची कामं कोण करणार, लोकशाहीत सत्ता असल्याशिवाय आपण सर्वसामान्यांना न्याय देऊ शकत नाही.” असे रवींद्र धंगेकर यांनी सांगितले.
पुढे बोलताना, “मी मध्यंतरी एकनाथ शिंदेंना कामानिमित्त भेटलो होतो. मी उदय सामंत यांच्याशीही मी संपर्कात होतो. त्यांनी वारंवार म्हटलं की, आमच्यासोबत काम करा. याची बरीच चर्चा झाली. मी ज्या भागात वर्षानुवर्षे काम करत आहे, तेथील लोकांशी बोललो. मग लक्षात आलं की, तुम्हाला काम तर करावचं लागेल. पण सत्तेशिवाय काम होत नाही. एकनाथ शिंदे यांनी मी काँग्रेसचा आमदार असतानाही मला मदत केली होती. मी आज माझा निर्णय घेतला, आपण शिंदे साहेबांसोबत काम करावं. आमची संध्याकाळी सात वाजता भेट होईल. त्यानंतर आमचा निर्णय होईल” अशी माहिती धंगेकर यांनी दिली.
काँग्रेस सोडण्याचे कारण काय?
दरम्यान, “शिंदे साहेब आणि उदय सामंत यांनी मला अनेकदा फोन केली. धंगेकर आमच्याकडे या, अशी ऑफर दिली. आमच्यात मित्रत्त्वाचं नातं आहे.त्यामुळे एकत्र काम करण्याचे ठरवले. माझा कोणाच्या बांधाला बांध नाही. त्यामुळे नाराजीचा प्रश्न नाही. माझी काँग्रेस पक्षावर कधीही नाराजी नव्हती. त्यांनी मला भरभरुन दिलं. पण राजकारणात कार्यकर्त्यांच्या भावना महत्त्वाच्या असतात. कार्यकर्त्यांचा कुठेतरी विचार करणं गरजेचे आहे. मी आज एकनाथ शिंदे यांना भेटणार आहे. त्यानंतर मी निर्णय घेईन” असे माध्यम माध्यमांशी बोलताना रवींद्र धंगेकर म्हणाले.