पुन्हा एक नोटबंदी! RBI 100, 10 आणि 5 रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून करणार बाद ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मार्च किंवा एप्रिलमध्ये १००, १० आणि ५ रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्याच्या विचारात आहे. शुक्रवारी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (आरबीआय) सहायक महाव्यवस्थापक बी महेश यांनी महत्वाची माहिती दिली आहे. बी महेश म्हणाले की, रिझर्व्ह बँक मार्च किंवा एप्रिलमध्ये १००, १० आणि ५ रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून परत घेण्याचा विचार करीत आहे. जिल्हा पंचायतीच्या नेत्रावती हॉल येथे जिल्हा अग्रणी बँकेच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय सुरक्षा समिती (डीएलएससी) आणि जिल्हास्तरीय चलन व्यवस्थापन समिती (डीएलएमसी) मध्ये ते बोलत होते.

महेश पुढे म्हणाले की, १००, १० आणि ५ रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद केल्या जातील. आरबीआयने मार्च-एप्रिलपर्यंत त्यामागे घेण्याची योजना आखली आहे. ते पुढे म्हणाले की, दहा रुपयांची नाणी सुरू झाल्याच्या १५ वर्षानंतरही व्यापारी आणि व्यावसायिकांनी नाणी स्वीकारल्या नाहीत. ज्यामुळं बँका आणि आरबीआयपुढे मोठी समस्या निर्माण झाली आहे. ते म्हणाले की, बँकांमध्ये १० रुपयांची नाणी मोठ्या प्रमाणावर जमा झाली आहेत.

नाण्यांच्या वैधतेबद्दल पसरविल्या जाणार्‍या अफवांविषयी बँकांनी लोकांना जागरूक केले पाहिजे, असे सांगून बी महेश पुढे म्हणाले की, बॅंकेने लोकांमध्ये १० रुपयांची नाणी चलनात आणण्यासाठी मार्ग शोधायला हवेत. २०१९ मध्ये, आरबीआयने गुजरातच्या पाटणमधील सरस्वती नदीच्या काठी वसलेल्या स्टेपवेलच्या ‘रानी की वाव’ची जांभळ्या रंगाची १०० रुपयांची नवीन नोट जारी केली होती.

“यापूर्वी जारी केलेल्या १०० रुपयांच्या सर्व नोटांची कायदेशीर निविदादेखील कायम राहतील,’ अशी माहिती रिझर्व्ह बँकेने १०० रुपयांच्या नव्या नोटा जाहीर करताना दिली होती. याशिवाय ८ नोव्हेंबर, २०१६ रोजी नोटाबंदीनंतर केंद्रीय बँकेने नोटा चलनात 2000 रुपयांच्या नोटा व्यतिरिक्त 200 रुपयांची नोट आणली होती.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment