हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सतत वाढत चाललेल्या महागाईमुळे RBI कडून शुक्रवारी पुन्हा एकदा रेपो दर वाढवण्याची घोषणा करण्यात आली. यावेळी RBI ने 50 बेसिस पॉइंट्स किंवा 0.50 टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यामुळे रेपो दर आता 5.90 टक्क्यांवर आला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी याबाबतची घोषणा केली. हे ;लक्षात घ्या कि, महागाई नियंत्रित करण्यासाठी आरबीआयकडून सातत्याने व्याजदरात वाढ केली जात आहे.
या दरवाढीचा परिणाम आता थेट सर्वसामान्यांवर होणार आहे. कारण रेपो दरात वाढ झाल्यानंतर बँकांकडूनही आपल्या व्याजदरात वाढ केली जाणार आहे. त्यामुळे आता बँकेकडून होम, पर्सनल आणि कार लोन घेणे महागणार आहे. तसेच ज्यांनी आधीच कर्ज घेतले असेल त्यांच्या ईएमआयही वाढ होईल. मात्र बँकेत पैसे जमा करणाऱ्या लोकांना याचा फायदा देखील होईल. कारण रेपो दरात वाढ केल्यानंतर बँका आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्सच्या व्याजदरातही वाढ करतील.
कोणा-कोणावर परिणाम होईल ???
हे लक्षात घ्या कि, होम लोनवरील व्याजदर हे 2 प्रकारात विभागले जातात. यातील पहिला म्हणजे फ्लोटर आणि दुसरा म्हणजे फ्लेक्सिबल. यातील फ्लोटरमधील कर्जाचे व्याजदर सुरुवातीपासून शेवटपर्यंत सारखेच असतात. यावर रेपो दरातील बदलाचा कोणताही परिणाम होत नाही. तर दुसरीकडे, फ्लेक्सिबल व्याजदर घेतल्यावर, रेपो दरातील बदलाचा थेट परिणाम कर्जाच्या व्याजदरावर होतो. अशा परिस्थितीत ज्यांनी फ्लेक्सिबल व्याजदराने कर्ज घेतले असेल त्यांच्या ईएमआय मध्ये वाढ होईल. त्याचप्रमाणे या दरवाढी नंतर आता होम, पर्सनल आणि कार लोन घेणाऱ्यांना जास्त व्याज द्यावे लागणार आहे.
महागाईवर नियंत्रण येईल
या दरवाढीमुळे महागाईवर नियंत्रण येण्याची अपेक्षा करण्यात येते आहे. रेपो रेटच्या रूपात महागाईशी लढण्यासाठी RBI कडे एक शक्तिशाली साधन आहे. हे जाणून घ्या कि, जेव्हा जेव्हा महागाई खूप जास्त असते, तेव्हा RBI कडून रेपो दर वाढवून अर्थव्यवस्थेतील पैशाचा फ्लो कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. तसेच रेपो दर वाढल्याने बँकांना आरबीआयकडून कर्ज घेण्यासाठी जास्त व्याज द्यावे लागते. ज्यामुळे बँकांकडूनही ग्राहकांसाठीचे कर्ज महाग करतात. यामुळे अर्थव्यवस्थेतील पैशाचा फ्लो कमी होतो. अशा प्रकारे पैशाच्या फ्लो कमी झाल्यामुळे मागणी कमी होते. तसेच मागणी कमी झाल्याने महागाई देखील कमी होण्याची अपेक्षा असते.
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.rbi.org.in/scripts/FS_Overview.aspx?fn=2752
हे पण वाचा :
RBI कडून रेपो दरात सलग चौथ्यांदा वाढ, आता कर्जे आणखी महागणार
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतीत आज झाली वाढ, पाहा ताजे दर
Bank FD : 1 ऑक्टोबरपासून ‘या’ बँकांच्या FD होणार बंद, त्याविषयी जाणून घ्या
Small Savings Scheme : खुशखबर !!! सरकारकडून छोट्या बचत योजनांच्या व्याजदरात वाढ, नवीन दर तपासा
Share Market पैसे गुंतवत असाल तर टॅक्सशी संबंधित ‘हे’ नियम जाणून घ्या