नवी दिल्ली । भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) नियामक निर्देशांचे पालन न केल्याबद्दल देशातील सर्वात मोठी कर्ज देणारी स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ला 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (फ्रॉड्स क्लासिफिकेशन अँड रिपोर्टिंग बाय कमर्शियल बँक्स अँड सिलेक्ट फायनान्शिअल इंस्टीट्यूशंस) निर्देश 2016 चे पालन न केल्याबद्दल SBI वर दंडात्मक कारवाई केल्याचे RBI ने म्हटले आहे.
SBI ग्राहकांवर काय परिणाम होईल?
RBI ने म्हटले आहे की, SBI ने व्यावसायिक बँका आणि निवडक वित्तीय संस्थांच्या वतीने ग्राहकांसोबत फसवणुकीचे क्लासिफिकेशन आणि रिपोर्टिंग देण्यासाठी नियमांचे उल्लंघन केले आहे. RBI ने म्हटले आहे की, बँकिंग नियमन अधिनियम, 1949 च्या कलम -47 ए (1) (सी) च्या तरतुदीनुसार दिलेल्या अधिकारांचा वापर करून त्याने हा दंड लावला आहे. तसेच ही कारवाई नियामक अनुपालनातील कमतरतांवर आधारित असल्याचे सांगितले. बँकेने ग्राहकांसोबत केलेल्या कोणत्याही व्यवहाराची किंवा कराराची वैधता प्रभावित होणार नाही.
RBI ने ग्राहकांच्या खात्याची तपासणी केली
रिझर्व्ह बँकेने SBI कडून सांभाळलेल्या ग्राहक खात्याची चौकशी केली आहे. SBI ने RBI च्या सूचनांचे पालन करण्यास उशीर केल्याचे उघड झाले. ग्राहक खात्याबरोबरच, RBI ने पत्रव्यवहार आणि त्याच्याशी संबंधित इतर गोष्टींचीही चौकशी केली. यामध्ये असे आढळून आले की खात्यातील फसवणुकीची माहिती उशिराने RBI ला देण्यात आली होती. या प्रकरणात, बँकेला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती की, सूचनांचे पालन न केल्याबद्दल त्यावर दंड का आकारला जाऊ नये. यावर SBI ने दिलेल्या उत्तरावर विचार केल्यानंतर RBI ने देशातील सर्वात मोठ्या सावकार SBI ला एक कोटी रुपयांचा दंड ठोठावण्याचा निर्णय घेतला.