हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । RBI : बँकाकडून अनेक कामांसाठी कर्ज घेतले जाते. बँकाकडून आपल्याला घर खरेदी करण्यासाठी देखील कर्ज मिळते याची माहिती सर्वांनाच आहे. मात्र जर आपल्याला घराच्या दुरुस्तीसाठी कर्ज मिळाले तर … होय जर एखाद्या व्यक्तीला आपल्या घराची दुरुस्ती किंवा रेनोवेशनचे कोणतेही काम करायचे असेल तर त्याला देखील कर्जाची सुविधा मिळेल. मात्र याबाबतची माहिती फारच कमी लोकांकडे असते.
RBI ने या संदर्भात सांगितले की, महानगरांमधील लोकांना प्राथमिक सहकारी बँकाकडून त्यांच्या घरांच्या दुरुस्तीसाठी किंवा रेनोवेशनसाठी 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळू शकेल.” RBI च्या या निर्णयामुळे आता घराच्या रेनोवेशनसाठी पैशांची गरज असणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
इथे हे लक्षात घ्या कि, सप्टेंबर 2013 मध्ये घर दुरुस्तीसाठी किंवा रेनोवेशनसाठी बँकांसाठी कर्ज देण्याची मर्यादा सुधारित करण्यात आली होती. त्याअंतर्गत, बँकांना ग्रामीण आणि लहान शहरांमध्ये 2 लाख रुपये आणि शहरी भागात 5 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देता येईल.
RBI ने प्राथमिक (शहरी) सहकारी बँकांसाठी जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, “आता अशा कर्जाची मर्यादा आता 10 लाख रुपये करण्यात आली आहे. 10 लाखांहून जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये आणि केंद्रांमध्ये दहा लाख रुपयांच्या कर्जाची मर्यादा आहे. इतर केंद्रांसाठी ही मर्यादा 6 लाख रुपये असेल.”
ज्या लोकांना आपल्या घराची दुरुस्ती करायची आहे. मात्र त्यांच्याकडे यासाठी पुरेसा पैसा नाही अशा लोकांना RBI च्या या निर्णयाचा फायदा होणार आहे. सध्याच्या वाढत्या महागाईच्या काळात ग्राहकांना त्रास होऊ नये म्हणून RBI कडून वेळोवेळी अशा प्रकारचे निर्णय घेतले जातात.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.rbi.org.in/Scripts/BS_ViewMasCirculardetails.aspx?id=9851
हे पण वाचा :
Honda कडून लवकरच लॉन्च केली जाणार दुसरी हायब्रिड कार !!! नवीन फीचर्सविषयी जाणून घ्या
Share Market : ‘या’ शेअर्सने 1 वर्षात गुंतवणूकदारांना दिला तब्ब्ल 250% रिटर्न !!!
Gold Price Today : सोन्यामध्ये घसरण तर चांदीमध्ये किंचित वाढ
Sim Card Rule : आता ‘या’ लोकांना सिमकार्ड मिळवण्यात येईल अडचण, जाणून घ्या सरकारचा नवा नियम