हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सतत वाढत चाललेल्या महागाईमुळे RBI कडून शुक्रवारी पुन्हा एकदा रेपो दर वाढवण्याची घोषणा करण्यात आली. यावेळी RBI ने 50 बेसिस पॉइंट्स किंवा 0.50 टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यामुळे रेपो दर आता 5.90 टक्क्यांवर आला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी याबाबतची घोषणा केली.
यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत शक्तिकांत दास यांनी सांगितले की, हे बदल तातडीने लागू केले जातील. या वर्षात RBI कडून व्याजदरात करण्यात आलेली ही चौथी वाढ आहे. याआधी देखील ऑगस्टमध्ये रेपो दरात 50 बेसिस पॉईंट्सने वाढ करण्यात आली होती. ज्यामुळे व्याजदर 4.90 टक्क्यांवरून 5.40 टक्के करण्यात आला होता.
या दर वाढीनंतर आता होम, पर्सनल आणि कार लोनसारख्या कर्जांच्या व्याजदरात वाढ होतील. यानंतर आता ग्राहकांच्या ईएमआयमध्ये देखील वाढ होईल. हे लक्षात घ्या कि, देशातील वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी RBI कडून व्याजदरात सातत्याने वाढ केली जात आहे. मात्र यानंतरही देशातील महागाईचा दर रिझर्व्ह बँकेने ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त झाला आहे. सध्या महागाईचा दर 7 टक्क्यांवर आहे.
RBI च्या या निर्णयानंतर आता बँकांकडून देण्यात येणारी कर्जे आणखी महागणार आहेत. बँकांची अनेक कर्जे ही थेट रेपो दराशी जोडली गेलेली असल्याने रेपो दरातील कोणत्याही बदलाचा परिणाम त्यावर होतो. ज्याचा फटका सर्वसामान्य ग्राहकांना बसतो. गेल्या काही काळापासून पॉलिसी दरांमध्ये वेळोवेळी वाढ झाल्यामुळे होम लोनवरील व्याज दर आता 8 टक्क्यांच्या पुढे जाणार आहेत. अशा परिस्थितीत घर घेणे महागणार आहे.
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.rbi.org.in/scripts/FS_Overview.aspx?fn=2752
हे पण वाचा :
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतीत आज झाली वाढ, पाहा ताजे दर
Bank FD : 1 ऑक्टोबरपासून ‘या’ बँकांच्या FD होणार बंद, त्याविषयी जाणून घ्या
Gold Investment : सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याची ही योग्य वेळ आहे का??? जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात
Saving Account बंद करण्यापूर्वी लक्षात ठेवा ‘या’ 5 गोष्टी, अन्यथा होऊ शकेल नुकसान
Small Savings Scheme : खुशखबर !!! सरकारकडून छोट्या बचत योजनांच्या व्याजदरात वाढ, नवीन दर तपासा