महाबळेश्वरला जाताय तर थांबा, घाटात दरड कोसळली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा- मेढा- महाबळेश्वर मार्गावर केळघर घाटात दरड कोसळली आहे. रेंगडी गावानजीक काळाकडा या ठिकाणी दरड कोसळली. दरड कोसळल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. महाबळेश्वरला जाणारे पर्यटक घाटात अडकून पडले आहेत. त्यामुळे या मार्गावर जाणाऱ्या पर्यटकांनी पर्यायी मार्गाने जावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, आज शुक्रवारी सकाळी केळघर घाटात दरड कोसळली. रस्त्यावर मोठ- मोठे दरड- माती पसरली आहे. त्यामुळे पूर्णपणे वाहतूक ठप्प झाली आहे. या मार्गावर प्रवास करणारे अनेकजण अडकले आहेत.  दरड हटविण्यासाठी शासकीय यंत्रणेला पाचारण केले आहे. दरड मोठी पडल्याने हटविण्यासाठी काही तास लागू शकतात.

सातारा येथून महाबळेश्वरला जाण्यासाठी या मार्गाचा प्रवाशी व पर्यटक मोठ्या प्रमाणावर वापर करत असतात. परंतु येथे दरड पडल्याने आता सातारकरांना तसेच मेढा परिसरातील लोकांना पर्यायी वाई- पाचगणी मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.