RBI Monetary Policy : बँकेत FD केलेल्यांना दिलासा, RBI ने व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) चलन धोरण समितीच्या (MPC) बैठकीत रेपो दरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. RBI चे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले की,”रेपो दर 4% आणि रिव्हर्स रेपो दर 3.35% राहील.” दास म्हणाले की,” कोरोनाचा धोका अजून संपलेला नाही. MPC च्या अपेक्षेनुसार अर्थव्यवस्था प्रगती करत आहे. लसीकरणामुळे अर्थव्यवस्था सुधारत आहे.”

शुक्रवारी तीन दिवसांच्या बैठकीनंतर RBI चे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले,”RBI ने रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेटमध्ये कोणताही बदल केलेला नाही. रेपो दर 4% आणि रिव्हर्स रेपो दर 3.35% वर कायम आहे.”

FD गुंतवणूकदारांना कसा लाभ मिळेल
RBI च्या या निर्णयानंतर आता रेपो दर आणि रिव्हर्स रेपो दर अनुक्रमे 4 टक्के आणि 3.35 टक्के दराने कायम ठेवण्यात आले आहेत. FD द्वारे बचत करणाऱ्यांसाठी पॉलिसी व्याज दरामध्ये कोणताही बदल झालेला नाही ही चांगली बातमी आहे. FD वरील व्याजदर आणखी कमी करण्याचा निर्णय बँका घेणार नाहीत. सध्या बँका FD वर 2.9 टक्के ते 5.4 टक्के व्याज देत आहेत.

बँकेत पैसे जमा करणाऱ्यांवर त्याचा कसा परिणाम होतो ते जाणून घ्या
RBI ने धोरणात्मक व्याजदरात कपात केल्यानंतर बँकाही येत्या काही दिवसांत FD दर कमी करतात. तथापि, FD दरातील ही कपात रेपो दराच्या प्रमाणात नाही. बँकेत पैसे जमा करणारा म्हणून, व्याजदरात कपात म्हणजे खात्यात नवीन ठेवींना कमी व्याज मिळेल. कमी व्याज दर म्हणजे ठेवीदारांच्या ठेवीवरील रिटर्न देखील कमी होईल. जास्त व्याज दर म्हणजे ठेवींवर जास्त रिटर्न मिळेल.