व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

RBI Monetary Policy: RBI ने व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही, GDP वाढीचा दर 9.5% वर कायम

नवी दिल्ली । भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) चलन धोरण समितीच्या (MPC) बैठकीत रेपो दरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. RBI चे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले की,”रेपो दर 4% आणि रिव्हर्स रेपो दर 3.35% राहील.” दास म्हणाले की,”कोरोनाचा धोका अजून संपलेला नाही. MPC च्या अपेक्षेनुसार अर्थव्यवस्था प्रगती करत आहे. लसीकरणामुळे अर्थव्यवस्था सुधारत आहे.”

शुक्रवारी तीन दिवसांच्या बैठकीनंतर RBI चे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले,” RBI ने रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेटमध्ये कोणताही बदल केलेला नाही. रेपो दर 4% आणि रिव्हर्स रेपो दर 3.35% वर कायम आहे.” रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखालील मौद्रिक धोरण समिती (MPC) ने 22 मे 2020 रोजी शेवटचा रेपो दर बदलला.

अर्थव्यवस्था झपाट्याने सुधारत आहे
RBI गव्हर्नर म्हणाले की,”रिझर्व्ह बँक सतत प्रयत्न करेल की महागाई दर लक्ष्याच्या आत राहील.” ते म्हणाले की,”MPC च्या सर्व 6 सदस्यांनी पॉलिसीच्या दरात बदल न करण्याचे मान्य केले आहे.” दास म्हणाले की,”अर्थव्यवस्थेत वेगाने सुधारणा होण्याची चिन्हे आहेत. पण मुख्य महागाई एक आव्हान आहे. जुलै-सप्टेंबरमध्ये किरकोळ महागाई अपेक्षेपेक्षा कमी होती.”

GDP वाढीचा दर 9.5% राहील
शक्तिकांत दास म्हणाले की,”MPC च्या मागील सभेपेक्षा यावेळी भारताची स्थिती बरीच चांगली आहे. वाढ सुदृढ होत आहे आणि महागाई अपेक्षेपेक्षा चांगल्या स्थितीत आहे. आर्थिक धोरण समितीने आर्थिक वर्ष 2021 साठी GDP वाढीचा दर 9.5% वर कायम ठेवला आहे.”

12 वाजता माध्यमांना संबोधित करताना
RBI गव्हर्नर आज 12 वाजता प्रसारमाध्यमांना संबोधित करतील. RBI चे लक्ष सतत महागाई कमी करणे आणि आर्थिक वाढीच्या रिकव्हरीवर आहे.