मुंबई । भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) शुक्रवारी सांगितले की, सरकारी सिक्युरिटीज एक्विझिशन प्रोग्राम (GSAP 2.0) अंतर्गत 25,000 कोटी रुपयांच्या सरकारी सिक्युरिटीजची पहिली खरेदी 12 ऑगस्ट रोजी केली जाईल. रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीनंतर गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी शुक्रवारी जाहीर केले की,” रिझर्व्ह बँक खुल्या बाजारात सरकारी बॉण्ड्स खरेदी करेल.”
RBI गव्हर्नर पुढे म्हणाले की,”मागणी वाढवण्यासाठी VRRR (Variable Rate Reverse Repo) ऑक्शन आयोजित केला जाईल. VRRR द्वारे 4 लाख कोटींपेक्षा जास्त ऑक्शन केले जातील. G-SEC 2.0 द्वारे बॉण्ड्स खरेदी करणे सुरू ठेवणार.” ते म्हणाले की,”GSAP ऑक्शन 12 ऑगस्ट आणि 26 ऑगस्ट रोजी घेण्यात येईल.”
RBI announces Open Market Purchase of Government of India Securities under G-sec Acquisition Programme (G-SAP 2.0)https://t.co/xMaWMUBurx
— ReserveBankOfIndia (@RBI) August 6, 2021
RBI ने आर्थिक वर्ष 2021-22 (FY22) साठी GDP वाढीचा अंदाज 9.5%वर कायम ठेवला आहे. त्याच वेळी, शक्तिकांत दास यांनी किरकोळ महागाई दर 5.7%असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. शहरी मागणी हळूहळू सुधारणे अपेक्षित आहे आणि ग्रामीण भागात खाजगी वापर वाढत आहे.
MPC च्या बैठकीत मध्यवर्ती बँकेने रेपो दरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. दास म्हणाले की,” रेपो दर 4% आणि रिव्हर्स रेपो दर 3.35% राहील. कोरोनाचा धोका अजून संपलेला नाही. MPC च्या अपेक्षेनुसार अर्थव्यवस्था प्रगती करत आहे. लसीकरणामुळे अर्थव्यवस्था सुधारत आहे.”