हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : एकीकडे जागतिक अर्थव्यवस्था घसरत चालली आहे. महागाई शिगेला पोहोचली आहे. ओपेक प्लसने कच्च्या तेलाचे उत्पादन कमी केले आहे. यामुळे कच्च्या तेलाची किंमत $100 च्या पुढे जाऊ शकते. मंदीचा फटका जगाला बसताना दिसत आहे. त्याच वेळी, सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह, सेंट्रल बँक ऑफ अमेरिका, युरोपियन सेंट्रल बँक आणि ब्रिटिश सेंट्रल बँक यांनी व्याजदरात वाढ केली आहे. त्यानंतरही आरबीआय गव्हर्नरने त्यांचे व्याजदर स्थिर ठेवले आहेत. व्याजदर वाढलेले नाहीत.
आरबीआयच्या बैठकीतील मोठ्या घोषणा :
- सर्वप्रथम, शक्तिकांत दास म्हणाले की, यावेळी रेपो दरात कोणतीही वाढ होणार नाही, म्हणजेच आरबीआयचा रेपो दर 6.50 टक्के राहील.
- आर्थिक वर्ष 2024 साठी, आर्थिक विकास दर 6.4 टक्के ते 6.5 टक्के असा अंदाज आहे. पहिल्या तिमाहीत विकास दर 7.8 टक्के, दुसऱ्या तिमाहीत 6.2 टक्के, तिसऱ्या तिमाहीत 6.1 टक्के आणि चौथ्या तिमाहीत 5.9 टक्के राहील.
- महागाईवर आरबीआय गव्हर्नर म्हणाले की, काम अजून संपलेले नाही. जोपर्यंत महागाई आरबीआयच्या पातळीपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत हे काम सुरू राहील.
- RBI ने आर्थिक वर्ष 2024 साठी महागाई दराचा अंदाज 5.3 टक्क्यांवरून 5.2 टक्क्यांवर आणला आहे.
- सिबिल स्कोअरबाबत, आरबीआयने सांगितले की, जर कोणी तुमचा सिबिल स्कोअर तपासला तर एसएमएसद्वारे माहिती दिली जाईल.
- CIBIL स्कोअर अंतर्गत कोणत्याही प्रकारची तक्रार असल्यास, ती देखील संस्थांना लवकरच सोडवावी लागेल.
- गेल्या वर्षी एप्रिल ते डिसेंबर या काळात चालू खात्यातील तूट 2.7 टक्के होती आणि ती जानेवारी ते मार्च 2023 या कालावधीत 2.2 टक्क्यांवर आली आहे.
- याशिवाय आरबीआय स्वतःचे पोर्टल सुरू करणार आहे.