हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतीय रिझर्व बँकेने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. गव्हर्नर शशिकांत दास यांच्या नेतृत्वाखाली हा निर्णय घेण्यात आलेला आहे. आरबीआयच्या माध्यमातून गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक बँकांवर कठोर कारवाई केलेली आहे. आणि त्यांना थंड देखील ठोठावला आहे. परंतु आता काही बँकांचे थेट लायसन्स रद्द करण्याचा मोठा निर्णय आरबीआयने घेतलेला आहे. यामध्ये देशातील दोन मोठ्या वित्तीय संस्थांचे लायसन देखील रद्द झालेले आहे.
तसेच तीन सहकारी बँकांवर आरबीआयकडून दंडात्मक कारवाई देखील केली गेलेली आहे. त्यामुळे बँकेत आणि वित्तीय संस्थांमध्ये सध्या भीतीचे वातावरण तयार झालेले आहे. आजकाल बँकिंगची सुविधा मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. अगदी खेड्यात पाड्यात देखील बँक ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. यामुळे पैशांचे व्यवहार करणे सोपे झाले आहे. नेट बँकिंगच्या माध्यमातून तसेच यूपीआयच्या माध्यमातून पैशाचे अनेक व्यवहार झालेले आहेत. कॅशलेस इकॉनोमीला देखील सुरुवात झालेली आहे.
परंतु जर काही लोकांनी व्यक्तीचे दोन बँक अकाउंट असते. तर त्याला दंड भरावा लागणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सोशल मीडियावर देखील याबाबत एक पोस्ट व्हायरल झाली होती.यामध्ये जर दोन बँक अकाउंट असतील तर ग्राहकांना दहा हजार रुपयांचा दंड भरावा लागू शकते, असे म्हटले जात होते. परंतु या व्हायरल व्हिडिओ मागची नक्की सत्यता काय आहे? हे आज आपण जाणून घेणार आहोत.
तुमच्या बँक अकाउंटमध्ये जर संशयास्पद व्यवहार अजून आले, तर आरबीआयच्या माध्यमातून तुमच्या बँक अकाउंटची चांगली कसून चौकशी होणार आहे. आणि जर यात काही तफावत आढळली, तर तुम्हाला कारवाई देखील होणार आहे. जर काही संशयास्पद व्यवहार असतील, तर तुमच्यावर दंडात्मक कारवाई होणार आहे. परंतु आरबीआयच्या नव्या नियमांमध्ये जर तुमचे दोन बँक अकाउंट असतील, तर ते अजिबात बेकायदेशीर नाही. तुमचे तर एकापेक्षा जास्त बँक अकाउंट असतील तर तुम्हाला कोणताही दंड भरावा लागणार नाही.