हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कोरोनाशी लढाई चालू असताना रिझर्व्ह बँकेने दिलासादायक निर्णय घेताना रेपो दरात ०.७५ टक्क्यांनी तर रिव्हर्स रेपो दरात ०.९० टक्क्यांनी कपात करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. नवीन निर्णयानुसार रेपो रेट आता ५.१५ वरुन ४.४० टक्क्यांवर आला आहे. काळ कठीण असला तरी तो कायम राहणार नाही असं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यावेळी म्हणाले.
Governor’s address to media https://t.co/vsfV13L0UK
— ReserveBankOfIndia (@RBI) March 27, 2020
आर्थिक स्थिरता यावी म्हणून हा निर्णय घेतला असल्याचं दास पुढे म्हणाले. रिझर्व्ह बँकेतील १५० लोक क्वारंटाईनमध्ये असल्याचंही दास यांनी सांगितलं. जगातील सर्वच देश आर्थिक मंदीतून पुढे जात असून कोरोनामुळे भारताच्या जीडीपीवरही परिणाम होणार आहे. सरकारी बँकांचे व्याजदर कमी करण्यात आले आहेत. व्याजदरात कपात केल्यामुळे सामान्य नागरिकांना त्यांच्या कर्जाचा हप्ता आता कमी भरावा लागणार आहे.