RBI Rules : ATM मधून पैसे काढताना फाटक्या नोटा आल्या तर..?? पहा काय सांगतो RBI चा नियम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (RBI Rules) अनेकदा आपण बाजारात जाताना पाकीट तपासत नाही. मग ऐन वस्तू खरेदी करताना आपल्या लक्षात येत की, आपल्याकडे तर पुरेसे पैसे नाहीत. अशावेळी पैसे काढण्यासाठी ATM कार्डचा वापर केला जातो. पण, बऱ्याचदा आपल्या लक्षात आले असेल. एकतर ATM बंद असतात नाहीतर ATM मधले पैसे संपलेले असतात. त्यातूनही नशिबाने एखादं ATM सापडलं जे सुरु आहे, त्यात पैसे देखील आहेत आणि पैसे काढताना जर फाटलेल्या नोटा आल्या तर???

बऱ्याचदा असा प्रसंग घडला तर घाबरायला होतं किंवा नेमकं काय करावं ते सुचत नाही. म्हणूनच अशा प्रसंगांबाबत रिझर्व बँकेने काही नियम जारी केले आहेत. ज्याबाबत तुम्हाला माहिती असायला हवी. ज्यामुळे समजा एखाद्या वेळी ATM मधून मधून फाटकी नोट आली तर तिचे काय करावे? ही नोट कुठे बदलावी आणि त्याबाबत आपले काय अधिकार आहेत? हे माहित असल्याने भीती वाटणार नाही. चला तर याविषयी RBI चे काय नियम (RBI Rules) आहेत याविषयी जाणून घेऊ.

ATM मधून फाटकी नोट आली तर..

समजा तुम्ही ATM मशीनचा वापर केल्यानंतर जर तुम्हाला फाटकी आली तर तुम्ही ज्या बँकेच्या एटीएममधून पैसे काढायला गेले आहात त्याच बँकेला तुम्हाला त्या बदलून देणे गरजेचे आहे. यासाठी एटीएम मधून पैसे काढल्यानंतर फाटकी न निदर्शनास आल्यास लगेच बँकेत जाऊन एक महत्वाचा अर्ज भरा.

(RBI Rules) हा अर्ज भरताना त्यामध्ये पैसे केव्हा काढले त्या दिवसाची तारीख, वेळ आणि एटीएम चे लोकेशन नमूद करा. तसेच या अर्जासोबत पैसे काढल्यानंतर एटीएम मधून मिळालेली स्लिपदेखील जोडा. जर तुम्ही स्लीप घेतली नसेल तर तुम्हाला मिळालेल्या एसएमएसच्या माध्यमातून व्यवहाराचा तपशील सादर करा. या प्रक्रियेनंतर संबंधित बँकेकडून तुम्हाला सर्व नोटा लगेच बदलून दिल्या जातील.

काय सांगतो RBI चा नियम? (RBI Rules)

ATM मध्ये फाटक्या नोटा आल्यास अशा प्रकारच्या नोटा बदलून देण्याबाबत रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून काही नियमावली सादर केलेली आहे. त्यानुसार ज्या बँकेच्या ATM मध्ये फाटलेल्या नोटा आल्या असतील त्या बँकेने नोटा बदलून देणे बंधनकारक आहे. हा नियम प्रत्येक बँकेला लागू आहे आणि त्यामुळे कोणत्याही बँकेला जुन्या तसेच फाटलेल्या नोटा बदलून देण्यास नकार देता येत नाही. बँकांना आपल्या सर्व शाखांमध्ये ही सेवा ग्राहकांना देणे बंधनकारक आहे.

फाटलेल्या नोटा कुठे बदलून देतात?

RBI विभागीय आणि सर्व सरकारी बँकांमध्ये अशा फाटक्या नोटा बदलून दिल्या जातात. (RBI Rules) मात्र, खाजगी बँक असल्यास खाजगी बँकांच्या चेस्ट शाखांमध्येच अशा नोटा बदलून मिळतील. फक्त अशा प्रकारची चेस्ट शाखा रिझर्व बँक ऑफ इंडिया कडून अधिकृत केलेली असायला हवी.

बँकेने फाटक्या नोटा बदलून देण्यास नकार दिला तर…

RBI च्या नियमानूसार खरतर कोणतीही बँक तुम्हाला फाटक्या नोटा बदलून देण्यास नकार देणार नाही. मात्र तरीही एखाद्या बँकेने तुम्हाला फाटक्या नोटा बदलून देण्यास नकार दिला तर अशावेळी संबंधित बँकेच्या विरोधात तुम्ही आरबीआयकडे रितसर तक्रार करू शकता. ही तक्रार ऑनलाइन स्वरूपात देखील करता येते. (RBI Rules) अशा तक्रारींवर कारवाई करताना RBI संबंधित बँकेवर १० हजारापर्यंत दंड आकारू शकते.