पुणे प्रतिनिधी । अक्षय कोटजावळे
आरबीआय नोव्हेंबर महिन्यात बँकिंग व्यवस्थेत 40 हजार कोटी रुपये टाकणार आहे, कारण बँकिंग व्यवस्थेमध्ये कॅशचा तुटवडा असल्यामुळे अशा वेळी आरबीआय ‘ओपन मार्केटिंग ऑपरेशन’ (OMO) द्वारे सरकारी बॉण्ड्सची खरेदी करते व परिणामी व्यवस्थेमध्ये रोखता वाढते. विशेष म्हणजे ‘आरबीआय’ने रुपयाची घसरण रोखण्यासाठी डॉलरची विक्री करून बँकिंग व्यवस्थेमधून रुपया घेतला होता. त्यामुळे रोखते मध्ये तुटवडा निर्माण झाला होता.
बँकिंग व्यवस्थेमध्ये मागील तीन आठवड्यांपासून रोखता/कॅशचा तुटवडा होता. ‘इंडिया रेटिंग’च्या नुसार व्यवस्थेमध्ये अंदाजे एक लाख कोटी रुपयांचा तुटवडा होता. आरबीआय आता ओपन मार्केटिंग द्वारे सरकारी बॉण्डची खरेदी करून व्यवस्थेमध्ये रोखता/कॅश वाढविणार आहे. म्हणजेच आरबीआयने 17 मे ला 10 हजार करोड रुपये बँकिंग व्यवस्थेत टाकले होते.
आरबीआयने 40 हजार करोड टाकण्याची घोषणा करताच BSI चा सेन्सेक्स 718 अंकांनी वाढला.