RBI | RBI म्हणजेच रिझर्व बँक ऑफ इंडियाचे सगळ्या बँकांवर खूप काटेकोरपणे लक्ष असते. अशातच आता रिझर्व बँक ऑफ इंडियाकडून देशातील दोन मोठ्या बँकांवर मोठी कारवाई करण्यात आलेली आहे. खाजगी क्षेत्रातील एचडीएफसी बँक आणि ॲक्सिस बँक यांच्यावर RBI ने कारवाई केलेली आहे. नियमांचे पालन केल्यामुळे या दोन बँकांना आरबीआयने कोट्यावधी रुपयांचा दंड ठोठावला आहे. आणि याबद्दल प्रसिद्ध पत्रक देखील जारी दिलेले आहे.
एचडीएफसी बँक ही देशातील खाजगी क्षेत्रातील एक सगळ्यात मोठी बँक आहे. त्याचप्रमाणे ॲक्सिस बँक देखील खूप मोठी बँक आहे. रिझर्व बँक ऑफ इंडियाने ठरवून दिलेल्या नियमांचे या दोन बँकांनी पालन केलेले नाही. त्याचप्रमाणे नियमांमध्ये हलगर्जीपणा दाखवला. त्यामुळे RBI ने या दोन बँकांवर मोठी कारवाई केलेली असेल आहे. जर तुमचेही या बँकेमध्ये खाते असेल, तर तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ही बातमी आहे.
2.91 कोटी रुपयांचा दंड
RBI ने ॲक्सिस बँक आणि एचडीएफसी बँक या दोन्ही बँकांना 2.91 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. रिझर्व बँक ऑफ इंडियाने दिलेल्या मार्गदर्शन तत्त्वांचे या बँकांनी पालन केलेले नाही. त्यामुळे ही कारवाई करण्यात आलेली आहे. ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या सेवेमध्ये देखील या बँकांकडून निष्काळजीपणा झालेला आहे. यामध्ये केवायसी ठेवीवरील व्याजदर आणि इत्यादी इतर बाबींचा समावेश आहे.
ॲक्सिस बँकेला दंड ठोठावला
आरबीआयने ऍक्सिस बँकेवर जास्त दंड ठोठावला आहे. जो 1.91 कोटी रुपये एवढे आहे बँकिंग रेगुलेशन 1949 बी आरच्या कलम 19 A या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे हा दंड ठोठावला आहे. या शिवाय ठेवींवरील व्याजदर आणि केवायसी सहकृषी अर्जाशी संबंधित सूचनांचे पालन न केल्यामुळे हा थंड ठेवण्यात आलेला आहे.
एचडीएफसी बँकेवर का कारवाई केली
रिझर्व बँक ऑफ इंडिया एचडीएफसी बँकेला 1 कोटी रुपयांचा दंड छोटावला आहे एचडीएफसी बँकेवर ठेवींवरील व्याजदर आणि बँकेची संबंधित वसुली एजंट निर्धारित मार्गदर्शक तत्वांचे पालन न केल्यामुळे हा दंड आकारण्यात आलेला आहे.