RBI ची घोषणा : आता 2000 रुपयांची नोट मिळणार नाही, नोटाबंदीनंतर हे चलन बाजारात आले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । लवकरच आपल्याला बाजारपेठेत 2000 च्या चलनी नोटा दिसणार नाहीत. कारण आता दोन हजारांच्या नोटा येणे बंद झाले आहेत. वास्तविक, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) हळूहळू सिस्टीम मधून 2000 रुपयांच्या नोटा काढण्यास सुरवात केली आहे. 2021-2022 या आर्थिक वर्षात 2000 रुपयांच्या नवीन नोटा छापल्या जाणार नाहीत अशी RBI ने घोषणा केली आहे. मागील वर्षीदेखील RBI ने 2000 रुपयांच्या नवीन नोटा छापलेल्या नव्हत्या. RBI ने आपल्या वार्षिक अहवालात ही माहिती दिली आहे. हा अहवाल 26 मे 2021 रोजी प्रसिद्ध करण्यात आला.

नोटाबंदीनंतर ही नोट आणली गेली
भारतात नोटाबंदीनंतर (Demonetization in India) वर्ष 2016 मध्ये 2000 रुपयांची नोट आणली गेली होती, परंतु मोठ्या मूल्याच्या नोटेमुळे बनावट चलन बाजारात जाण्याचा धोकाही जास्त आहे. रिझर्व्ह बॅंकेच्या वार्षिक अहवालानुसार आर्थिक वर्ष 2021 मध्ये एकूण पेपर कॅश 0.3 टक्क्यांनी घटून 2,23,301 लाख युनिट्सवर पोहोचली. मूल्याच्या दृष्टीने मार्च 2021 मध्ये 4.9 लाख कोटी रुपयांच्या 2000 च्या नोटा सिस्टीम मध्ये होत्या, तर मार्च 2020 मध्ये त्याचे मूल्य 5.48 लाख कोटी रुपये होते.

3 वर्षात 2000 च्या नोटा लक्षणीयरित्या घटल्या
RBI च्या अहवालानुसार मार्च 2018 मध्ये 2000 सिस्टीम मध्ये 336.3 कोटीच्या नोटा होत्या, परंतु 31 मार्च 2021 पर्यंत त्यांची संख्या 245.1 कोटींवर आली आहे. म्हणजेच या तीन वर्षात 91.2 कोटी नोटा सिस्टीम मधून काढल्या गेल्या आहेत.

500 रुपये अधिक लोकप्रिय आहेत
या अहवालानुसार, 31 मार्च 2021 पर्यंत 500 आणि 2,000 रुपयांच्या नोटांचा वाटा एकूण प्रचलित बँकांच्या नोटांपैकी 85.7 टक्के होता. तर 31 मार्च 2020 अखेर हा आकडा 83.4 टक्के होता. प्रमाणानुसार, 31 मार्च 2021 रोजी चलनात असलेल्या 500 रुपयांच्या नोटांचा वाटा 31.1 टक्के नोटा होता.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment