Thursday, March 30, 2023

एबी डीव्हिलियर्स इन ऍक्शन ; नेट मध्ये केला जोरदार सराव

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच IPL च्या स्पर्धेला युएईमध्ये १९ सप्टेंबरपासून स सुरुवात होणार आहे. तर १० नोव्हेंबरला आयपीएलचा अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. त्यानुसार सर्व संघ आणि खेळाडू युएईमध्ये दाखल झाले. आपापल्या संघासोबत क्वारंटाइन कालावधी संपवून आता हळूहळू संघ मैदानात उतरताना आणि सराव करताना दिसत आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघदेखील नुकताच नेट्समध्ये सरावासाठी हजर झाला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारलेल्या Mr.360 एबी डीव्हिलियर्सच्या फलंदाजीची झलक खूप दिवसांनी सर्वाना पाहायला मिळाली. त्याने आपल्या साथीदारांसह सराव करताना फटकेबाजीचा आनंद लुटला.

- Advertisement -

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये खेळाडू मैदानावर सराव करत आहेत. डीव्हिलियर्सदेखील दीर्घ काळानंतर फलंदाजीसाठी नेट्समध्ये उतरला. डीव्हिलियर्सला दुसऱ्या सराव सत्रात संधी मिळाली. पहिल्या नेट सत्रात कर्णधार विराट कोहली, दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेन, फिरकीपटू युजवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर आणि शाहबाज नदीम हे खेळले होते. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने अजूनही आयपीएल करंडक जिंकलेला नाही. यावेळी त्यांना ते शक्य होतं का ते पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’