हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रिकरिंग डिपॉझिट्स (RD) ही एक प्रकारची डेट इन्वेस्टमेंट आहे. यामध्ये FD प्रमाणे एकरकमी रक्कम जमा करण्याची गरज नसते. आरडी मध्ये आपल्याला दर महिन्याला एक ठराविक रक्कम जमा करता येते. चला तर कोणत्या बँकांमध्ये आरडी वर किती व्याज मिळत आहेत हे जाणून घेउयात …
ICICI Bank – 16 जूनपासून या बँकेच्या RD वर नवीन व्याजदर लागू होणार आहेत. ग्राहकांना या बँकेकडून 6 महिने ते 10 वर्षांपर्यंतच्या आरडी गुंतवणुकीचा पर्याय मिळतो. इथे कमीत कमी 3.75 तर जास्तीत जास्त 5.75 टक्के व्याज मिळेल. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना 4.25 ते 6.50 टक्के व्याज मिळेल.
IndusInd Bank – या बँकेच्या RD चा कालावधी 9 महिने ते 61 महिने आहे. बँक सर्वसामान्य नागरिकांना किमान 5.50 टक्के आणि जास्तीत जास्त 6.50 टक्के व्याज दर देत आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना 6 ते 7 टक्के व्याज मिळत आहे.
RBL Bank – या बँकेच्या RD चा कालावधी 7 दिवस ते 240 दिवस आहे. 8 जूनपासून या बँकेच्या आरडी चे नवे दर लागू होणार आहेत. ही बँक सर्वसामान्य नागरिकांना किमान 3.25 टक्के आणि जास्तीत जास्त 6.65 टक्के व्याज देत आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना किमान 3.75 टक्के आणि जास्तीत जास्त 7.15 टक्के व्याज मिळेल.
HDFC Bank – HDFC बँकेने देखील 17 जून रोजी आपल्या RD चे व्याजदर बदलले आहेत. आता या बँकेच्या ग्राहकांना किमान 3.75 टक्के आणि जास्तीत जास्त 4.75 टक्के व्याज दिला जात आहे. त्याचा कालावधी 6 महिने ते 120 महिन्यांपर्यंत आहे. इथे ज्येष्ठ नागरिकांना किमान 4.25 आणि जास्तीत जास्त 6.5 टक्के व्याज दिले जात आहे.
Yes Bank – 18 जूनपासून या बँकेचे नवीन दर लागू होणार आहेत. या बँकेच्या RD चा कालावधी 6 महिने ते 10 वर्षे आहे तर कमीत कमी व्याज 4.75 टक्के आणि जास्तीत जास्त व्याज 6.50 टक्के आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी 5.25 आणि 7.25 टक्के व्याज दर असेल.
Kotak Mahindra Bank – या बँकेच्या RD चा कालावधी 6 महिने ते 10 वर्षांपर्यंत आहे. इथे 10 जूनपासून नवे दर लागू होणार आहेत. इथे किमान 4.75 टक्के आणि जास्तीत जास्त 5.90 टक्के व्याज मिळेल. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना किमान 5.25 टक्के आणि जास्तीत जास्त 6.40 टक्के दराने व्याज मिळेल.
अधिक माहिती साठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.bankbazaar.com/recurring-deposit-rates.html
हे पण वाचा :
Cyber Froud : ऑनलाइन अकाउंट्स आणि आर्थिक डेटा सुरक्षित कसा ठेवावा ??? अशाप्रकारे जाणून घ्या
खुशखबर !!! आता Yes Bank ने देखील FD वरील व्याजदरात केली वाढ
Jio च्या ‘या’ प्लॅनमध्ये 75 मध्ये फ्री कॉलिंग सहित मिळतोय 2.5GB डेटा !!!
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात वाढ, आजच्या किंमती तपासा
Share Market : घसरत्या बाजाराची येत्या आठवड्यात वाटचाल कशी राहील ??? तज्ञांचे मत जाणून घ्या