हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आज निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) तारखा जाहीर केली आहे. त्यानुसार येत्या 29 एप्रिलपासून लोकसभा निवडणुकीचे मतदान सुरू होणार आहे. तर या निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी जाहीर करण्यात होईल. महत्वाचे म्हणजे, आज झालेल्या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगाकडून काही महत्त्वाच्या सूचना करण्यात आल्या आहेत. म्हणजेच आजपासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेल्या सूचनांचे पालन नाही केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल.
- लोकसभा निवडणुकीत एखाद्या व्यक्तीने दोन वेळा मतदान केले तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. याकाळात कोणी दारू वाटप केली किंवा साड्या वाटप केल्या तर त्या विरोधात देखील कारवाई केली जाईल.
- जिथे इतर पक्षांच्या सभा सुरू असतील, त्याठिकाणी दुसऱ्या कोणत्याही पक्षाने मिरवणूक काढू नये, एका पक्षाने लावलेले पोस्टर दुसऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काढू नये.
- सर्व राजकीय पक्षांनी आणि त्यांच्या उमेदवारांनी दुसऱ्या पक्षाच्या सभेत अडथळे निर्माण होणार नाहीत किंवा तसे प्रयत्नही केले जाणार नाहीत याबाबत काळजी घ्यावी.
- नेत्यांनी आपल्या समर्थकांना त्यांच्या परवानगीशिवाय एखाद्या व्यक्तीची जमिनी, इमारत, परिसर, भिंती अशा ठिकाणी झेंडे बॅनर माहिती पोस्टर लावण्यास परवानगी देऊ नये.
- कोणत्याही मतदाराला देणे त्यांना मत करण्यास धमकावणे मतदार केंद्राच्या शंभर मीटरच्या आत प्रचार करणे हे सर्व प्रकार गुन्ह्याअंतर्गत धरले जातील.
- मतदानाच्या 48 तास अगोदरच निवडणुकीच्या प्रचार आणि सार्वजनिक सभांवर बंदी असेल.
- धार्मिक ठिकाणांचा म्हणजेच मंदिर, मज्जिदचा वापर प्रचारासाठी करू नये.
- विविध जाती धर्मात मतभेद किंवा द्वेष पसरेल असे कृत्य करू नये, वक्तव्यही करू नये.
- कोणत्याही पक्षाच्या नेत्याच्या आणि कार्यकर्त्याच्या वैयक्तिक आयुष्यावर भाष्य करता कामा नये.