Real Estate : बॉलिवूड सेलिब्रिटींची रिअल इस्टेटमध्ये मोठी कमाई; मुंबईतील फ्लॅट विक्रीतून 118% नफा

0
1
AB
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Real Estate : बॉलिवूडमधील दिग्गज सेलिब्रिटींनी रिअल इस्टेटमधील गुंतवणुकीतून मोठा नफा मिळवला आहे. 2025 मध्ये अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, सोनाक्षी सिन्हा, आणि सुभाष घई यांनी एकूण ₹122 कोटींच्या किमतीला मुंबईतील त्यांच्या फ्लॅट्सची (Real Estate) विक्री केली.

गुंतवणुकीतून भरघोस नफा

अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, सोनाक्षी सिन्हा, आणि सुभाष घई यांनी 2016 ते 2021 दरम्यान मुंबईतील विविध भागांमध्ये ₹56.1 कोटी गुंतवून फ्लॅट्स खरेदी केले होते. 2025 च्या सुरुवातीला त्यांनी हे फ्लॅट्स ₹122.42 कोटींना विकले, ज्यामध्ये 118% सरासरी नफा नोंदवला गेला.

अमिताभ बच्चन (Real Estate)

अमिताभ बच्चन यांनी अंधेरी येथील “द अटलांटिस” इमारतीतील 27 आणि 28 व्या मजल्यावरील डुप्लेक्स अपार्टमेंट ₹83 कोटींना विकले. हे अपार्टमेंट त्यांनी एप्रिल 2021 मध्ये ₹31 कोटींना खरेदी केले होते. या अपार्टमेंटमध्ये 5,185 चौरस फूट कार्पेट एरिया आणि 4,400 चौरस फूट टेरेस एरिया (Real Estate) आहे.

अक्षय कुमार (Real Estate)

अक्षय कुमार यांनी बोरिवली येथील फ्लॅट ₹4.25 कोटींना विकला. 2017 मध्ये हा फ्लॅट ₹2.38 कोटींना विकत घेतल्यामुळे त्यांनी 78% नफा मिळवला.

सोनाक्षी सिन्हा

सोनाक्षी सिन्हा यांनी वांद्रे येथील फ्लॅट ₹22.50 कोटींना विकला. हा फ्लॅट त्यांनी मार्च 2020 मध्ये ₹14 कोटींना खरेदी केला होता, ज्यामध्ये 61% नफा नोंदवला गेला.

सुभाष घई (Real Estate)

दिग्दर्शक सुभाष घई यांनी अंधेरी येथील फ्लॅट ₹12.85 कोटींना विकला. 2016 मध्ये हा फ्लॅट ₹8.72 कोटींना खरेदी केला होता. विक्रीनंतर त्यांनी फेब्रुवारी 2025 मध्ये वांद्रे वेस्ट येथे ₹24 कोटींना नवीन फ्लॅट खरेदी केला.

गुंतवणुकीपूर्वी विचारात घ्या या गोष्टी

उत्साहपूर्ण रिअल इस्टेट गुंतवणुकीमुळे सामान्य गुंतवणूकदारांनीही या बाजारात गुंतवणुकीबाबत विचार करायला सुरुवात केली आहे. तज्ज्ञांच्या मते, रिअल (Real Estate) इस्टेट गुंतवणूक वैयक्तिक आर्थिक उद्दिष्टांवर अवलंबून असते.

करआकारणी: अंडर-कंस्ट्रक्शन प्रॉपर्टीवर 5% जीएसटी, स्टँप ड्युटी, नोंदणी शुल्क आणि भाड्याच्या उत्पन्नावरील कराचा विचार करावा.
लाभांश कर: 24 महिन्यांनंतर मालमत्ता विकल्यास नफा लाँग-टर्म कॅपिटल गेन (LTCG) म्हणून मानला जातो आणि त्यावर 12.5% कर लागतो.
इतर पर्याय: रिअल इस्टेट व्यतिरिक्त सोनं, शेअर मार्केट, आणि बॉण्ड्समध्ये गुंतवणुकीचा विचार केला जाऊ शकतो.
रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करताना गुंतवणूकदारांनी दीर्घकालीन फायदे मिळवण्यासाठी योग्य आर्थिक नियोजन करणे गरजेचे आहे.