Real Estate : स्वप्न नगरी म्हणून मुंबईची ओळख आहे. इथे सर्वात काय असेल तर राहण्यसाठीची जागा. मुंबईमध्ये सध्या घरभाड्याच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. मागील एका वर्षात तब्बल 30% पर्यंत वाढ झाली असून, ही आतापर्यंतची सर्वाधिक भाडेवाढ ठरली आहे. बांधकाम उद्योगाच्या अभ्यासावर आधारित एका सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे.
पुनर्विकासामुळे वाढलेली मागणी (Real Estate)
मुंबई शहर आणि उपनगरांतील अनेक इमारती 50-60 वर्षांहून जुन्या झाल्या आहेत. त्यामुळे त्या पुनर्विकासासाठी देण्याचा कल वाढला आहे.
पुनर्विकासाच्या कालावधीत रहिवाशांना त्यांच्या परिसरातच घर भाड्याने घ्यायचं असतं, कारण मुलांची शाळा, दैनंदिन सोयी यांचा विचार केला जातो.
त्यामुळे त्या परिसरातील घरांची मागणी वाढते आणि त्याचा परिणाम भाड्याच्या दरांवर होतो.घरमालकही (Real Estate) या संधीचा फायदा घेत भाड्याचे दर वाढवतात.
किती आहे घरभाडे ? (Real Estate)
विशेषतः पश्चिम उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणावर इमारतींचा पुनर्विकास सुरू आहे. त्यामुळे मागणी आणि पुरवठा यामध्ये मोठी तफावत निर्माण झाली आहे.
अनेक ठिकाणी 50,000 ते 1.25 लाख रुपये पर्यंत भाडं आकारलं जात आहे. मुंबईतील पायाभूत सुविधांचे (इन्फ्रास्ट्रक्चर) प्रकल्प विशेषतः पश्चिम उपनगरांमध्ये वाढले आहेत. यामुळे घरांच्या किमती आधीच जास्त आहेत आणि परिणामी भाड्याच्या दरातही वाढ होत आहे. प्रकल्प पूर्ण होण्यासाठी किमान 2-3 वर्षे लागतात, त्यामुळे घरमालक वर्षाकाठी 8-10% भाडेवाढ करत आहेत.
मुंबई – जगातील महागड्या शहरांपैकी एक
मुंबई ही जगातील सर्वात महागड्या शहरांपैकी एक मानली जाते. येथे रिअल इस्टेटचे दर प्रचंड वाढले आहेत, त्यामुळे भाड्याने राहणेही कठीण झाले आहे.
पुढील काही वर्षांत ही वाढ आणखी होण्याची शक्यता आहे. मुंबईत घर भाड्याने घेण्याचा विचार करत असाल, तर या वाढत्या (Real Estate) दरांचा विचार नक्की करा