Real Estate : रिअल इस्टेट क्षेत्रातही मुंबईचा दबदबा ! एका महिन्यात 12 हजार मालमत्तांची विक्री

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Real Estate : आपल्याला माहितीच असेल की दीर्घकालीन गुंतवणुकीच्या पर्यायांचा विचार करता. इतर गुंतवणुकीच्या पर्यायांपैकी रिअल इस्टेट क्षेत्रातील गुंतवणुकीला गुंतवणूकदार प्राधान्य देताना दिसत आहेत. कारण या क्षेत्रातील गुंतवणूक ही चांगला परतावा देणारी गुंतवणूक समजली जाते.

महाराष्ट्राच्या बाबतीत विचार करायचे झाल्यास मुंबई आणि पुणे या दोन महत्वाच्या शहरांमध्ये गुंतवणूक मागच्या काही वर्षात वाढल्याचे दिसून येत आहे. मुंबईमध्ये केवळ एका जुलै महिन्यात १२ हजार १२९ मालमत्तांची विक्री झाल्याची आकडेवारी आता समोर आली आहे. एवढेच नव्हे तर यातून सरकारला १०४७ कोटींचा महसूल मिळाला आहे. नाईट फ्रॅंक याच्या सर्वेक्षण अहवालातून ही माहिती समोर आली आहे. चला जाणून घेऊया या (Real Estate) अहवालाबाबत …

काय सांगतो अहवाल ? (Real Estate)

नाईट फ्रॅंक ने दिलेला अहवाल हा जानेवारी ते जुलै दरम्यानचा आहे. यामध्ये या काळात मुंबईमध्ये तब्बल 84,653 मालमत्तांची विक्री झाली आहे. याद्वारे राज्य सरकारला 6,929 कोटींचा महसूल मिळाला आहे. तर गेल्या वर्षीच्या पहिल्या सहामाहीच्या (Real Estate) तुलनेत ही वाढ 16% इतकी झाल्याचे या अहवालामध्ये म्हंटले आहे

मुंबईतल्या ‘या’ भागाला पसंती (Real Estate)

आता आपण पाहूयात की क्षेत्रफळानुसार विक्रीचे प्रमाण किती आहे? तर जुलै महिन्यात 500 चौरस स्क्वेअर फुट ते एक हजार चौरस फूट क्षेत्रफळाच्या फ्लॅटचे एकूण विक्रीतले प्रमाण हे 49 टक्के इतके आहे. तर 500 चौरस फुटांपर्यंतच्या फ्लॅटचे एकूण विक्रीतील प्रमाण हे 38% इतके आहे. घर खरेदीसाठी ग्राहकांची पसंती ही प्रामुख्याने पश्चिम आणि पूर्व उपनगराला मिळाल्याचे दिसून येत आहे. (Real Estate) तेथील विक्रीचे प्रमाण हे 73% इतके मोठे आहे. मध्य मुंबईतील घरांच्या विक्रीतही वाढ होताना दिसत असून या विक्रीचा गेल्या जुलै महिन्यातील विक्रीच्या तुलनेत 41 टक्के इतकं प्रमाण अधिक आहे

मागच्या वर्षीची आणि यावर्षीच्या विक्रीची तुलना केली असता गेल्यावर्षी जुलैमध्ये मुंबईत एकूण दहा हजार 221 मालमत्तांची विक्री झाली होती. त्याच्या तुलनेत यावर्षी विक्रीमध्ये 16 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली असून जून 2024 मध्ये मुंबईमध्ये 11,673 मालमत्तांची (Real Estate) विक्री झाली आहे.