Realme 12X : 50MP कॅमेरा, 24GB RAM सह Realme ने लाँच केला नवा मोबाईल; किंमत किती?

Realme 12X launch
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Realme 12X : प्रसिद्ध मोबाईल ब्रँड Realme ने आपल्या Realme 12 सिरीज अंतर्गत नवीन मोबाईल बाजारात लाँच केला आहे. Realme 12X असे या स्मार्टफोनचे नाव आहे. कंपनीने सध्या तरी हा मोबाईल चीनमध्ये लाँच केला असून येत्या काही दिवसात तो भारतात सुद्धा सादर होण्याची शक्यता आहे. 50-मेगापिक्सल कॅमेरा आणि 24GB RAM सह हा स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे. आज आपण या मोबाईलचे खास फीचर्स आणि त्याच्या किमतीबाबत सविस्तर जाणून घेणार आहोत.

6.67 इंचाचा डिस्प्ले –

Realme 12X मोबाईलची जाडी 7.89 मिमी आणि वजन 190 ग्रॅम आहे. कंपनीने या स्मार्टफोन मध्ये 120Hz रिफ्रेश रेट सह 6.67 इंचाचा LCD डिस्प्ले दिला आहे. हा डिस्प्ले 625 निट्स पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो. या मोबाईल मध्ये MediaTek Dimensity 6100+ प्रोसेसर देण्यात आला असून हा स्मार्टफोन Android 14 वर आधारित Realme UI 5.0 वर काम करतो. Realme 12X हा मोबाईल IP54 रेटिंगसह येतो, म्हणजेच धूळ आणि स्प्लॅशपासून या मोबाईलला कसलाही प्रॉब्लेम होणार नाही.

कॅमेरा- Realme 12X

आता आपण वळूया मोबाईलच्या कॅमेराकडे, तर Realme 12X मध्ये पाठीमागील बाजूला 50MP चा मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे. तर समोरील बाजूला 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवरसाठी या स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 15W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हा Realme चा हा मोबाईल 12GB+12GB व्हर्च्युअल रॅम आणि 256GB/512GB स्टोरेज व्हेरिएन्ट मध्ये लाँच करण्यात आला आहे.

किंमत किती ?

मोबाईलच्या किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, Realme 12X च्या 12GB + 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत ¥1399 म्हणंजेच भारतीय चलनानुसार १६००० रुपये आहे. तर 12GB + 512GB स्टोरेज वेरिएंटची किंमत ¥1599 म्हणजेच १८००० रुपये आहे. हा स्मार्टफोन ब्लूबर्ड आणि ब्लॅक जेड या दोन रंगात उपलब्ध करण्यात आला आहे.