549 रुपयांत मिळतोय Realme 9i 5G मोबाईल; कुठे आहे ऑफर?

Realme 9i 5G Discount offer
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या देशात तरुणाईला मोबाईलचे मोठं वेड असून नवनवीन मोबाईल खरेदीकडे अनेकांचा कल असतो. परंतु मोबाईलच्या किमती या सर्वानाच परवडणाऱ्या नसतात. काही जण आपला जुना मोबाईल विकून त्यामध्ये येणाऱ्या पैशात काही पैसे घालून नवीन मोबाईल घेतात. तुम्ही सुद्धा नवा मोबाईल घेणार असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. आम्ही तुम्हाला असा मोबाईल सांगणार आहोत जो तुम्ही फक्त 549 रुपयांत खरेदी करू शकता. होय, हे खरं आहे. Realme 9i 5G हा मोबाईल फ्लिपकार्ट वर तुम्हाला फक्त 549 रुपयांत मिळतोय.

काय आहे डिस्काउंट ऑफर?

Realme 9i 5G हा मोबाईल फ्लीपकार्टवर 14,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. परंतु यावर 14,450 रुपयांचा एक्सचेंज बोनस दिला जात आहे. त्यामुळे जर तुमच्याकडे जुना मोबाईल असेल आणि चांगल्या कंडिशन मध्ये असेल तर तुम्ही तुमचा जुना मोबाईल एक्सचेंज करून अवघ्या 549 रुपयांमध्ये Realme 9i 5G खरेदी करू शकता. त्यामुळे नव्या मोबाईल खरेदीमध्ये तुमचे पैसे वाचणार आहेत.

Realme 9i 5G चे फीचर्स –

या मोबाईल ला 6.6-इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे. मोबाईलला Mediatek Dimensity 810 5G Processor मिळतो. हा मोबाईल कंपनीने 4 GBरॅम 64 GB स्टोरेज या व्हेरियेण्ट मध्ये सादर केला आहे. Realme 9i 5G ला 5000 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. मोबाईलच्या कॅमेरा बद्दल सांगायचं झाल्यास, या स्मार्टफोनला ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे ज्यामध्ये 50 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, 2 मेगापिक्सल अल्ट्रावाईड अँगल आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा मिळतो. याशिवाय सेल्फी आणि व्हिडिओ कॉल साठी समोरील बाजूला 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

अधिक जाणून घेण्यासाठी या वेबसाईटला भेट द्या- Click Here