हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध मोबाईल ब्रँड Realme ने भारतात ग्राहकांना परवडेल अशा किमतीत नवा 5G लाँच केला आहे. Realme C65 5G असे या मोबाईलचे नाव असून यामध्ये ग्राहकांना अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. अवघ्या 10,499 रुपयांच्या बेस व्हेरियेण्टमध्ये हा स्मार्टफोन लाँच करण्यात आल्याने बाजारात हा मोबाईल धुमाकूळ घालणार यात काही शंकाच नाही. आज आपण या स्मार्टफोनचे खास फीचर्स जाणून घेऊयात….
6.67-इंचाचा डिस्प्ले-
Realme C65 5G स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.67-इंचाचा IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेला 625 nits पीक ब्राइटनेस मिळतो. कंपनीने मोबाईल मध्ये MediaTek Dimensity 6300 6nm प्रोसेसर बसवला असून यामध्ये 4GB रॅम + 64GB स्टोरेज, 4GB+ 128GB आणि 6GB+ 128GB स्टोरेज देण्यात आले आहे. याशिवाय वर्चुअल रॅम द्वारे आणखी 6GBरॅम तुम्ही वाढवू शकता.
कॅमेरा – Realme C65 5G
मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, Realme C65 5G स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. यामध्ये 50MP चा प्राथमिक कॅमेरा, 2 MP सेकंडरी कॅमेरा आणि समोरील बाजूला सेल्फी आणि विडिओ कॉल साठी 8 MP चा फ्रंट कॅमेरा आहे. पॉवर साठी रिअलमी च्या या मोबाईल मध्ये 5000 mAh ची बॅटरी उपलब्ध असून ही बॅटरी 15W चार्जिंगला सपोर्ट करते. स्मार्टफोन मध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आणि IP54 रेटिंग मिळतेय.
किंमत किती?
Realme C65 5G च्या 4GB रॅम + 64GB स्टोरेज मॉडेलची किंमत 10,499 रुपये, 4GB+ 128GB स्टोरेज व्हेरिएन्टची किंमत 11,499 आणि 6GB+ 128GB स्टोरेज असलेल्या हँडसेटची किंमत 12,499 रूपये आहे. हा स्मार्टफोन काळ्या आणि हिरव्या रंगात लाँच करण्यात आला असून आतापासूनच त्याची विक्री आज दुपारी 4 वाजल्यापासून सुरू होईल.