हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध मोबाइल (Realme GT Neo 3T) कंपनी realme ने आपला नवा स्मार्टफोन GT Neo 3T भारतात लॉन्च केला आहे. या मोबाईलचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हा स्मार्टफोन फक्त 12 मिनिटांत 50 टक्के चार्ज होतो. आज आपल्या मोबाईल रिव्हिव्ह मध्ये जाणून घेऊया या मोबाईलचे काही खास फीचर्स आणि किमतीबाबत ..
6.62-इंचाचा डिस्प्ले –
Realmeया मोबाईलला 120Hz च्या रिफ्रेश रेटसह (Realme GT Neo 3T) 6.62-इंचाचा फुल HD+ E4 AMOLED डिस्प्ले आहे. डिस्प्लेची ब्राईटनेस 1,300 nits आहे. हा स्मार्टफोन Android 12 वर आधारित Realme च्या प्रोप्रायटरी Realme UI 3.0 सह प्री-लोड केलेला आहे. जीटी निओ सीरिजच्या या स्मार्टफोनमध्ये ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 870 प्रोसेसर आहे. तसेच हा मोबाईल फोन स्टेनलेस स्टील व्हेपर कूलिंग सिस्टमसह देखील येतो.
कॅमेरा- (Realme GT Neo 3T)
मोबाईलच्या कॅमेरा बाबत (Realme GT Neo 3T) बोलायचं झाल्यास , या स्मार्टफोन ट्रिपल कॅमेरा सेटअप सह येतो. यामध्ये 64-मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर, 8-मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड सेन्सर आणि 2-मेगापिक्सेलचा मॅक्रो कॅमेरा सेन्सर आहे . याशिवाय सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 16-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे.
5000mAh बॅटरी-
Realme च्या नव्या मोबाईल मध्ये Wi-Fi, 5G, 4G LTE, Bluetooth v5.2, NFC आणि USB Type-C पोर्ट आहे. या स्मार्टफोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे. मोबाईल 80W सुपरडार्ट चार्जिंगला सपोर्ट असलेली 5000mAh बॅटरी उपलब्ध आहे .
किंमत –
मोबाईलच्या किमतीबाबत बोलायचं झाल्यास , या स्मार्टफोनच्या 6 GB RAM सह 128 GB स्टोरेजची किंमत 29,999 रुपये आहे, तर 8 GB RAM सह 128 GB स्टोरेजची किंमत 31,999 रुपये आणि 256 GB स्टोरेजसह 8 GB रॅमची किंमत 33,999 रुपये आहे. Realme GT Neo 3T ची विक्री 23 सप्टेंबरपासून Realme च्या साइट आणि सर्व स्टोअर्समधून होईल. हा मोबाईल डॅश यलो, ड्रिफ्टिंग व्हाइट आणि शेड ब्लॅक कलरमध्ये खरेदी केला जाऊ शकतो.