Realme च्या ‘या’ Mobile ची विक्री आजपासून सुरू; किंमत आणि फीचर्स पहा

Realme narzo 60 Pro 5G
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सर्वात लोकप्रिय स्मार्टफोन निर्माता कंपनी असलेल्या Realme ने Narjo 60 सीरीज नुकतीच लाँच केली आहे. या अंतर्गत कंपनीने Realme Narzo 60 5G आणि realme narzo 60 Pro 5G हे २ मोबाईल लाँच केले होते. कंपनी बऱ्याच दिवसांपासून या सीरीजवर काम करत होती. इतकेच नाही तर नवीन मोबाईल घेण्याच्या विचारात असलेले अनेक ग्राहकही या स्मार्टफोनची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर आजपासून कंपनीने या स्मार्टफोनची विक्री सुरु केली आहे. या मोबाईलचे खास फीचर्स, त्याची किंमत आणि हा मोबाईल कुठून व कसा खरेदी करावा याबद्दल सविस्तर माहिती आज आपण जाणून घेऊया….

Realme Narzo 60 5G किंमत –

8GB+128GB – रु. 17,999
8GB+256GB – रु. 19,999

Realme Narzo 60 5G Pro किंमत –

8GB+128GB – 23,999 रुपये
12GB + 256GB – 26,999 रुपये
12GB+1TB – 29,999 रुपये

कुठे खरेदी करता येईल –

तुम्ही कंपनीच्या अधिकृत वेबसाइट http://realme.com आणि Amazon India वेबसाइटवरून 18 जुलै 2023 पर्यंत हा 5G स्मार्टफोन खरेदी करू शकता. या पहिल्या सेलमध्ये, तुम्ही हा स्मार्टफोन SBI क्रेडिट कार्ड आणि EMI ICICI बँक क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग आणि EMI द्वारे खरेदी केल्यास, तुम्हाला 1500 रुपयांची झटपट सूट मिळू शकते.

Realme narzo 60 Pro 5G चे स्पेसिफिकेशन-

Realme Narjo 60 Pro 5G स्मार्टफोनमध्ये 120Hz च्या रिफ्रेश रेटसह कर्व दृष्टीचा डिस्प्ले आहे. Realme Narjo 60 Pro 5G मध्ये MediaTek Dimensity 7050 5G SoC प्रोसेसर देण्यात आला आहे. फोनच्या मागील बाजूस 100 मेगापिक्सेल OIS Prolite कॅमेरा आहे. तर सेल्फी आणि विडिओ कॉल साठी समोरील बाजूला 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. या मोबाईल फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे. ही बॅटरी 67W SUPERVooc चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते.