हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | प्रसिद्ध मोबाईल ब्रँड Realme चे मोबाईल स्वस्तात मस्त मोबाईल म्हणून ओळखले जातात. इतर स्मार्टफोन निर्माता कंपन्यांपेक्षा रिअलमीचे मोबाईल कमी पैशात उपलब्ध असल्याने सर्वसामान्य ग्राहकांची पसंती नेहमीच Realme च्या मोबाईलला मिळते. ग्राहकांची हीच नस ओळखून कंपनीने आणखी एक स्वस्तात मस्त आणि सर्वसामान्य ग्राहकाला परवडेल अशा किमतीत नवा मोबाईल लाँच केला आहे. Realme Narzo 70x 5G असे या स्मार्टफोनचे नाव असून कंपनीने या मोबाईलची सुरुवातीची किंमत फक्त 11,999 रुपये ठेवली आहे. आज आपण रिअलमी च्या या हँडसेटचे खास फीचर्स जाणून घेणार आहोत.
6.72 इंचाचा डिस्प्ले –
Realme Narzo 70x 5G मध्ये कंपनीने 120hz रिफ्रेश रेटसह 6.72 इंचाचा स्मूथ डिस्प्ले दिलेला आहे. या डिस्प्लेला 950nits पीक ब्राइटनेसचा सपोर्ट मिळतो. मोबाईल मध्ये MediaTek Dimensity 6100+ चिपसेट वापरण्यात आली असून हा स्मार्टफोन 4GB + 128GB आणि 6GB + 128GB व्हेरियंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. पॉवरसाठी मोबाईल मध्ये 5000mAh बॅटरी वापरण्यात आली असून ही बॅटरी 45W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
कॅमेरा – Realme Narzo 70x 5G
मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, Realme Narzo 70x 5G मध्ये पाठीमागील बाजूला 50MP AI कॅमेरा आणि 2MP चा मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. तर समोरील बाजूला सेल्फी आणि विडिओ कॉल साठी 16MP फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. रिअलमी चा हा स्मार्टफोन Android 14 वर आधारित Realme UI 5.0 वर काम करतो. यात दोन वर्षांचे अँड्रॉइड अपडेट्स आणि तीन वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्स मिळतील
किंमत किती?
मोबाईलच्या किमतीबाबत बोलायचं झाल्यास, Realme Narzo 70x 5G च्या 4GB + 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 11,999 रुपये ठेवण्यात आली आहे तर 6GB + 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 13,499 रुपये आहे. हा मोबाईल निळ्या आणि हिरव्या रंगात ग्राहक खरेदी करू शकतात. त्यासाठी तुम्हाला Realme च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.