#HappyMakarSankranti | मकर संक्रांत हा सन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मकर संक्रांत हा शेतीविषयक सन असून तो साजरा करण्यामागे काही दंतकथा आणि कारणे देखील आहेत. खालील पाच कारणांमुळे मकर संक्रांत हा सन साजरा केला जातो.
१) सूर्य ज्या दिवशी दक्षिणायनातून उत्तरायणात मार्गक्रमण करतो त्या तिथीला मकरसंक्रांत साजरी केली जाते.
२) या दिवशी सूर्य धनू राशीतून मकर राशीत प्रवेश होतो.
३) या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते. पृथ्वी वरुन पाहिले असता, सुर्याच्या उगविण्याची जागा दिवसेंदिवस उत्तरेकडे सरकते.
४) पौष महिन्यात सुर्य मकर राशीत प्रवेश करतो व उत्तरायण सुरू होऊन उत्तर गोलार्धात राहणाऱ्या आपण भारतीयांना जास्त प्रकाश व उष्णता मिळण्यास सुरूवात होतो.
५) हा दिवस मोठा होतो व रात्र लहान होत असते. म्हणून सर्वांना मकर संक्रमण दिवस हा उत्सवाच्या स्वरूपात स्वागतार्ह वाटतो.