मुंबई । देशात इंधन दरवाढीचा ऐतिहासिक भडका उडाला आहे. पेट्रोल आणि डीझेलच्या किमतीत सातत्याने अभूतपूर्व वाढ होत आहे. त्यामुळे महागाई दरही वाढताना पाहायला मिळत आहे. गुरुवारी मुंबईमध्ये पेट्रोल प्रति लीटर 90.34 रुपये, तर डीझेल 80.51 रुपये प्रति लीटर आहे. नोव्हेंबरच्या सुरुवातीपासून कच्च्या तेलाच्या किमतीत प्रति बॅरल 30 टक्क्यांनी वाढ होऊन 51 डॉलर प्रति बॅरल झाली आहे. महाराष्ट्रातील परभणीमध्ये सर्वात महाग म्हणजे 92.76 रुपये प्रति लीटरच्या दराने पेट्रोल मिळत आहे. (petrol-diesel prices)
या इंधन दरवाढीमागच कारण तपासले असता तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार कच्च्या तेलाची किंमत 9 महिन्यातील सर्वाधिक स्तरावर पोहोचली आहे. मार्चनंतर पहिल्यांदाच क्रूड ऑईलची किंमत 50 डॉलर प्रति बॅरलच्या वर आहे. अशा स्थितीत पेट्रोलची किंमत 100 रुपये प्रति लिटरपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. तर डीझेलच्या किमतीतही मोठी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. क्रूड ऑईलची वाढत्या किंमतीसॊबतच सरकार आकारात असलेले इंधन कर सुद्धा इंधन पेट्रोल-डीझेलच्या किमती वाढण्यास हातभार लावत आहेत.
याशिवाय 2010 मधील सरकारच्या निर्णयानंतर पेट्रोलची किंमत तेल कंपन्या ठरवतात. त्यानंतर 2017 मध्ये डीझेलची किंमत निश्चित करण्याचा अधिकारही तेल कंपन्यांना देण्यात आला. इतकच नाही तर एप्रिल 2017 मध्ये पेट्रोल आणि डीझेलची किंमत रोज निश्चित केली जाईल, असा निर्णय झाला. या निर्णयामुळे तेलाच्या किमतीत झालेल्या चढउताराचा फायदा सर्वसामान्य नागरिक आणि तेल कंपन्यांनाही होईल असा तर्क लावण्यात आला होता. मात्र, आतापर्यंत पेट्रोल-डीझेलच्या वाढत्या किमतीचा सामन्यांना फायद्यापेक्षा आर्थिक झळचं जास्त पोहोचत असल्याचे दिसून येत आहे.
कधी मिळणार दिलासा?
कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घट होण्याची शक्यता नाही. पण पुढील काही दिवसांत 2 ते 4 डॉलर प्रति बॅरलपर्यंत तेलाच्या किमती कमी होण्याच अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केलाय. पण सरकारने करात सवलत दिली तर पेट्रोल आणि डीझेलच्या किमती थोड्या कमी होऊ शकतील. (Consistent rise in petrol-diesel prices)
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’