ज्याला मेसेज येणार त्याला करोनाची लस मिळणार -राजेश टोपे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे  यांनी कोरोना लसीबाबत (Corona vaccine ) महत्त्वाची माहिती दिली. “केंद्र सरकार कोरोना लसीबाबत मायक्रो प्लॅनिंग करत आहे. लस देण्यासाठी कार्यपद्धती आहे, ज्या तारखेला लस द्यायची आहे, त्या व्यक्तीला मेसेज केला जाईल. त्यानंतर तो येईल. त्याची ओळख पटल्यावर त्याला लस देण्यात येईल” असं राजेश टोपे म्हणाले.

18 हजार लोकांना ट्रेनिंग द्यायचं काम आता पूर्ण होईल. स्टोरेजसाठी कोल्डचेन व्यवस्था झाली आहे. लस देण्यासाठी कार्यपद्धती आहे. ज्या तारखेला लस द्यायचे आहे, त्या व्यक्तीला मेसेज मिळेल, तो येणार,त्याची ओळख पटल्यावर त्याला लस देणार, असं मायक्रो प्लॅनिंग सुरु असल्याचं टोपे म्हणाले.लसीकरणाबाबत केंद्र सरकार माहिती मागवत आहे. हेल्थ वर्कर्स, अत्यावशक सेवेतील कर्मचारी, ५० वर्षांवरील नागरिक शिवाय इतर आजार असलेले ५० वर्षांवरील नागरिक यांची माहिती गोळा केली जाते आहे असंही आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.

लस केंद्र सरकार पुरवेल अशी माझी खात्री आहे. जी काम राज्य सरकारने करायची ते आम्ही करत आहोत. केंद्राने मोफत लसीकरण केलं पाहिजे अशी सगळ्या राज्यांची अपेक्षा आहे. असे झाल्यास मोफत लसीकरण शक्य असल्याचे ते म्हणाले. मोफत लस मिळावी अशी आमची अपेक्षा आहे. केंद्र सरकार सूचना देईल ती कार्यवाही करु असेही ते म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment